Star Plus celebrated 25 years in star Parivar awards 2025 : भारतातील एक अत्यंत लोकप्रिय मनोरंजन वाहिनी स्टार प्लसने स्टार परिवार अवॉर्डस 2025 या बहुप्रतीक्षित सोहळ्यासह आपली वार्षिक परंपरा साजरी केली. या वाहिनीवरील लाडक्या मालिका आणि व्यक्तिरेखा यांचा गौरव करण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते, पण यंदा हा सोहळा अधिक भव्य आणि रोमांचक होता. कारण एक ऐतिहासिक टप्पा या वाहिनीने पूर्ण केला आहे.
हवामान खातं सांगतयं तेच घडतयं; कृषिमंत्री राहिलेले पवार मराठवाड्यातील परिस्थिती पाहून आवाक
स्टार प्लसने एन्टरटेन्मेंट उद्योगात 25 वैभवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाचा दुहेरी आनंद साजरा करणाऱ्या या सोहळ्यात उत्साह, नेत्रदीपक परफॉर्मन्सेस आणि जुन्या आठवणींचे सुंदर आणि अभिमानाचा अनुभव देणारे अविस्मरणीय क्षण होते. एका विशेष प्रेस कॉन्फरन्सद्वारे या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर उलगडलेल्या कार्यक्रमामुळे हा पुरस्कार सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला.
दसऱ्याचा मुहुर्त साधत, शरद पवारांच्या आमदारचा पुत्र भाजपमध्ये जाणार?
स्टार प्लसच्या प्रवासाचा अविभाज्य असलेल्या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय नामवंतांच्या उपस्थितीमुळे रेड कार्पेट चमकून उठले. उर्वशी ढोलकिया, श्वेता तिवारी, आपले पती विवेक दहियासह आलेली दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, करण मेहरा, अमर उपाध्याय, रागिणी खन्ना, जय सोनी, जिया मानेक, रोनित रॉय, हर्ष राजपूत, करण पटेल वगैरे मान्यवारांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
रितेश देशमुखच्या उपस्थितीत ‘वडापाव’चा धमाकेदार ट्रेलर लाँच!
या भव्यतेत भर घालत होते स्टार प्लसचे इतर अनेक लाडके चेहरे, जसे की, रूपाली गांगुली, समृद्धी शुक्ला, मेघा चक्रवर्ती, कमर राजपाल, कंवर ढिल्लों, नेहा हरसोरा, श्रीतमा मित्रा, पुनीत चौकसे, अद्रिजा रॉय, शिवम खजुरिया, दिव्या पाटील, मंजीत मक्कर, संदिप्ता सेन, अहम शर्मा, विशाल सिंह, रिया कपूर, आश्लेषा सावंत, संजय नार्वेकर, अदिती त्रिपाठी, अक्षित सुखिजा, अनंग देसाई, सुमित सचदेव, अरिजीत तनेजा, खुशी दूबे, झैन इबाद खान, राजन शाही आणि इतर अनेक कलाकार. या सर्वांच्या उपस्थितीमुळे ही खरोखर एक तारकांनी चमचमणारी रात्र दिसत होती.
दुष्काळी मराठवाड्यात जलप्रलय! धाराशिवमध्ये ढगफुटी, लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढलं
या समारंभात केवळ ग्लॅमर नव्हते तर प्रतिभेचा गौरव होता आणि अद्भुत परफॉर्मन्स होते. ऊर्जावान डान्स परफॉर्मन्सेस, हृदयस्पर्शी क्षण आणि प्रतिष्ठित पुरस्कारांच्या घोषणेमुळे हा मंच दुमदुमून गेला. स्टार प्लस ही वाहिनी ज्या ऊर्जेबद्दल आणि सर्जनशीलतेबद्दल ओळखली जाते, तिचे दर्शन या सोहळ्यात घडले. महान वरिष्ठ कलाकारांपासून ते नवीन होतकरू प्रतिभावंतांपर्यंत प्रत्येकाच्या योगदानाचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.
कसं आहे आजचं ग्रहमान? कोणत्या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी? जाणून घ्या…
स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 सह स्टार प्लसने आपला वैभवशाली भूतकाळ साजरा केला आणि रोमांचक भविष्याची हमी दिली. कथाकथनाच्या नवीन युगात पदार्पण करताना या वाहिनीने प्रेरणादायक, मनोरंजक आणि अविस्मरणीय क्षण सादर करण्याच्या आपल्या वारशाला अबाधित ठेवले. या रौप्य महोत्सवी समारंभात दमदार परफॉर्मन्स, भावनिक विजयाचे क्षण आणि आनंदोत्सव पाहण्यासाठी पहात रहा स्टार प्लस.