दुष्काळी मराठवाड्यात जलप्रलय! धाराशिवमध्ये ढगफुटी, लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढलं

Dharashiv जिल्ह्यातील परंडा तालुक्या स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एयरलिफ्ट करत वाचवण्यात आलं आहे.

Dharashiv

Cloud Brust in Dharashiv people rescue by air lift : एरव्ही दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यामध्ये सध्या अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. शेतीसह अनेकांचे घरं अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांना ढगफुटीने जलप्रलय आल्याचे चित्र निर्माण झाला आहे तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अशाच प्रकारे जोरदार पाऊस पडत आहे.

कसं आहे आजचं ग्रहमान? कोणत्या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी? जाणून घ्या…

या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्ते बंद आहेत शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे यावेळी परंडा तालुक्यातील देवगावमध्ये लोकांनी जीव वाचवण्यासाठी घराच्या छताचा आधार घेतला. त्यामध्ये 25 ते 30 नागरिकांना घराच्या छतावरून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एयरलिफ्ट करत वाचवण्यात आला आहे.

धाराशिवमध्ये ढगफुटी, लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढलं…

धाराशिव जिल्ह्यामध्ये पुरस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. अनेक गावांमध्ये घरांसह शेतांसह घरांना पुराचा वेढा पडला आहे. यावेळी नागरिकांनी घराच्या छतांचा आधार घेत जीव वाचवताना दिसत आहेत. नागरिकांची हेलिकॉप्टरच्या साह्याने एअरलिफ्ट करत सुटका करण्यात आली.

पोलिस निरीक्षकाकडून लग्नाचं अन् तरूणीशी शारीरिक संबंध; अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार

यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील पाण्यामध्ये उतरून नागरिकांना वाचवताना दिसून आले. याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिक तसेच शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ आणि भरीव मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

follow us