Download App

ऐश्वर्या रजनीकांतच्या दागिन्यांची चोरी करणं पडलं महागात; घरातल्या ‘या’ सदस्यावर गुन्हा

चेन्नई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत (Rajnikanth)यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth)सध्या चर्चेत आहे. नुकतीच ऐश्वर्या रजनीकांतच्या लॉकरमधून लाखोंच्या दागिन्यांची चोरी (Theft of Jewellery)झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री ऐश्वर्या रजनीकांतने चेन्नई पोलिसांकडे(Chennai Police) तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ऐश्वर्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे. चोरीच्या आरोपात अभिनेत्रीच्या घरातील मोलकरीण (Maid)आणि कार चालकाला (Car Driver)अटक (Arrest)केली आहे.

ऐश्वर्यानं पोलीस तक्रारीत म्हटले होते की, चेन्नईतील तिच्या घराच्या लॉकरमधून 3 लाखांहून अधिक किंमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. त्यात सोने, हिरे आणि चांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. ऐश्वर्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू, 17 गंभीर जखमी

अशातच एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, चेन्नई पोलिसांना या प्रकरणात यश मिळालं आहे. ऐश्वर्याच्या घरातील मोलकरीण ईश्वरी आणि कार चालक व्यंकटेश यांना अटक केली आहे.

अनेक दिवसांपासून घरी काम केल्यामुळे ईश्वरीला लॉकरच्या चावीची पूर्ण माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिनाभरापूर्वी ही चोरी झाली होती. यासोबतच ऐश्वर्या रजनीकांतच्या मोलकरणीने कार चालकाच्या सांगण्यावरून हे काम केले होते. तिने स्वतःला घर खरेदीसाठी दागिन्यांचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. ईश्वरीकडून तिच्या घराची कागदपत्रेही जप्त केली आहेत.

Tags

follow us