तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू, 17 गंभीर जखमी

तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू, 17 गंभीर जखमी

कांचीपुरम : तामिळनाडूतील कांचीपुरम येथे आज एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण (Crackers factory is terrible) आग लागली. या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील ही दुर्घटना आहे. कांचीपुरम जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली. ही आग इतकी भयावह होती की, ही आग लागताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे लोट हे दुरूनही दिसत होते. ही आग बघातच बघ्यांनी अग्निशमन दिल आणि पोलिसांना या आगीची माहिती दिली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल एक दिड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

बिड्या वाटायचं ठरलं तरीही पैसे पुरणार नाही; मंत्री रावसाहेब दानवेंचे अजब वक्तव्य

अग्निशमन दलाच्या जवानांनी ही भीषण आग आटोक्यात आणतांना बचाव कार्यही केलं. जवानांनी या कारखान्याला लागेलल्या भीषण आगीतून 27 जणांची सुटका केली. गंभीर जखमी झालेल्यांना तात्कळ जवळच्या रूग्णालयात नेले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर यातील 8 जणांनी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कारखान्यात 25 जण काम करत होते

कांचीपुरमचे जिल्हाधिकारी एम. आरती यांनी सांगितले की, कारखान्यात २५ लोक काम करत होते. दुसरीकडे अग्निशमन आणि बचाव सेवा विभागाचे डीजीपी आभास कुमार यांनी सांगितले की, स्फोटामुळे कारखान्याची संपूर्ण इमारत कोसळली आहे.अग्निशमन दल आणि जिल्हा पोलिस बचाव कार्यात गुंतले आहेत.

आठवड्यातील दुसरी घटना

तामिळनाडूतील फटाका कारखान्याला लागलेल्या आगीची ही एका आठवड्यातील दुसरी घटना आहे. याआधी,  धर्मपुरी येथे गुरुवारी फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला होता, तर एक जण जखमी झाला होता.

या प्रकरणी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींना एक लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती.

दरम्यान, या फटाख्याच्या कारखान्याला नेमकी आग कशी लागली, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube