Download App

Stree 2: श्रद्धा आणि राजकुमारच्या ‘स्त्री 2’ सिनेमातील ‘तुम्हारे ही रहेंगे हम’ रोमँटिक गाणं प्रदर्शित

Stree 2 Movie: 'तुम्हारे ही रहेंगे हम' या गाण्याची सुरुवात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यातील अतिशय गोड संवादाने होते.

Stree 2 Tumhare Hi Rahehan Hum : प्रेक्षक राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) अभिनीत 2018 मध्ये आलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘स्त्री 2’ ची (Stree 2) आतुरतेने वाट पाहत आहेत. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांसारखे स्टार्स असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच, त्याचे पहिले गाणे ‘आज की रात’ रिलीज झाल्यापासूनच लोकप्रिय आहे. त्याचवेळी आता त्याचा बहुप्रतिक्षित ‘तुम्हारे ही रहेंगे हम’ (Tumhare Hi Rahehan Hum) हा ट्रॅकही रिलीज झाला आहे. या गाण्यात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्यातील निष्पाप प्रेमाचे चित्रण करण्यात आले आहे.

‘तुम्हारे ही रहेंगे हम’ गाणे रिलीज

‘तुम्हारे ही रहेंगे हम’ या गाण्याची सुरुवात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यातील अतिशय गोड संवादाने होते. ‘स्त्री’ चित्रपटाचा पहिला भाग असाच संपला. या सीनमध्ये असे दिसते की, जेव्हा श्रद्धा कपूर बसमध्ये चढणार आहे, तेव्हा राजकुमार राव तिला विचारतो की तिला त्याच्याशी बोलावेसे वाटले तर तिने काय करावे. ज्याला श्रद्धा अगदी निरागसपणे म्हणते, ‘बस… माझी आठवण कर.’ असं म्हणत ती बसमध्ये चढते आणि तिच्या प्रवासाला निघून जाते.

गाण्याचा शेवट धोकादायक होता

यानंतर राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यातील निरागस प्रेमाने भरलेल्या क्षणांची सिरीज आहे. रोमँटिक ट्रॅकच्या शेवटी, राजकुमार राव आपले बोट श्रद्धा कपूरच्या चेहऱ्यावर फिरवतो आणि तिच्या ओठांवर थांबतो, रोमँटिक ‘स्त्री’ दहशतीने भरलेली दिसते आणि अभिनेत्याचे बोट चावते. हा ट्रॅक अत्यंत मधुर आहे आणि वरुण जैन, शिल्पा राव, सचिन-जिगर यांनी गायला आहे. या गाण्याचे भावपूर्ण संगीत सचिन-जिगर या संगीत दिग्दर्शक जोडीने दिले आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.

Stree 2 Release Date: प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार श्रद्धाचा ‘स्त्री 2’ 

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त ‘स्त्री 2’ चित्रपटात पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करत आहेत. दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’सोबत टक्कर देणार आहे.

follow us