श्रीकांत अन् मिस्टर अँड मिसेस माहीनंतर Rajkumar Rao पुन्हा मजेदार, भयानक आणि ब्लॉकबस्टरसाठी सज्ज!

श्रीकांत अन् मिस्टर अँड मिसेस माहीनंतर  Rajkumar Rao पुन्हा मजेदार, भयानक आणि ब्लॉकबस्टरसाठी सज्ज!

Rajkumar Rao Ready for Stree 2 after Shrikanth and Mr and Mrs Mahi : अभिनेता राजकुमार राव ( Rajkumar Rao ) त्याच्या अष्टपैलु व्यक्तमत्त्व आणि वैविध्यपुर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. नुकतच त्याने श्रीकांत आणि मिस्टर अॅन्ड मिसेस माही या चित्रपटातून प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. त्यानंतर तो पुन्हा एकदा एका मजेदार, भयानक आणि ब्लॉकबस्टरसाठी सज्ज झाला आहे.

धक्कादायक! फक्त दिल्लीच नाही जगातील ‘या’ शहरांनाही पाण्याच्या दुष्काळाचा धोका

आता ‘स्त्री 2’ मध्ये सर्वाधिक पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार राव पुन्हा विकीच्या भूमिकेत दिसणार असून त्याचे चाहते यासाठी उत्सुक आहेत. बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून विशेष म्हणजे, मॅडॉक फिल्म्सच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ सोबत थेट थिएटरमध्ये हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

पती बनला CM, पत्नीचा दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा; ‘या’ राज्यात मोठ्या घडामोडी

पहिल्या फ्रेमपासून निर्माते हे स्पष्ट करतात की सिक्वेल अधिक मजेदार, भयानक आहे आणि त्यात वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बनण्यासाठी तो सज्ज आहे. चित्रपटगृहांमध्ये टीझरचे साक्षीदार असलेले चाहते या चित्रपटासाठी उत्सुक असून राजकुमार रावचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियांनुसार हा चित्रपट 2024 हे मधा राजकुमार रावचा ब्लॉकबस्टर ठरणार आहे.

मराठवाडा अन् विदर्भासाठी आनंदाची बातमी! छत्रपती संभाजीनगर ते नागपूर विमानसेवा लवकरच सुरू

राजकुमार रावचे पाठोपाठ रिलीज होत असणारे चित्रपट हे दाखवून देतात की तो कमालीचा अभिनेता आहेच तो त्याच्या ‘श्रीकांत’ चित्रपटात दृष्टिहीन उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत दिसला होता ज्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती, तर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मध्ये तो क्रिकेटर-कोचच्या भूमिकेत दिसला होता. दोन वैविध्यपूर्ण भूमिका ज्यांनी राजकुमार रावला या पुरस्काराच्या मोसमात नक्कीच पसंती दिली आहे. त्यांनी अभिनेत्याची अष्टपैलुत्व सिद्ध केली आहे.

तसेच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. खरं तर, ‘स्त्री’ नंतर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा राजकुमार रावचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आणि आता असे दिसते आहे की ‘स्त्री 2’ पूर्वीचे रेकॉर्ड देखील मोडेल. पण इथेच न थांबता राजकुमार ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्ये अभिनेता तृप्ती दिमरीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याच्या पाइपलाइनमध्ये आणखी काही मनोरंजक प्रकल्प आहेत ज्यांची तो लवकरच घोषणा करेल!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज