पती बनला CM, पत्नीचा दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा; ‘या’ राज्यात मोठ्या घडामोडी

पती बनला CM, पत्नीचा दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा; ‘या’ राज्यात मोठ्या घडामोडी

Sikkim Assembly Election : सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या (Sikkim Assembly Election) पत्नी कृष्णा कुमारी राय यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकला. त्यांच्या या राजीनाम्याची राज्यात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे उमेदवार बिमल राय यांचा पराभव केला. विधानसभेचे सचिव ललित कुमार गुरुंग यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की विधानसभेचे अध्यक्ष एम एन शेरपा यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

कृष्णा कुमारी राय मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या पत्नी आहेत. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 31 जागा जिंकत बहुमत मिळवले. राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघातही विजय मिळवला. तमांग अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या शपथविधीसाठी गेले होते. तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्यांनी 5 हजार 302 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांना 71.6 टक्के मते मिळाली होती.

मोदी सरकार नव्हे तर, NDA सरकार; बहुमताला हुलकावणी मिळताच मोदींची भाषा बदलली

या विजयानंतर मात्र त्यांनी लगेचच आमदारकी सोडण्याचाही निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती देण्यासाठी त्यांना विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना एक पत्र लिहिले आणि राजीनामा का दिला याचं कारणही सांगितलं. या पत्रात त्या म्हणतात, मला कधीच वाटलं नव्हतं की मी इतक्या लवकर राजकारणात येईल. मी राजकारणाला नेहमीच सामाजिक गतिविधीच्या रुपात पाहिलंय. यासाठीच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता कारण मला संसदीय मंडळ आणि पक्षाच्या अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करायचा होता.

लोकांची सेवा करण्यासाठी मला कोणत्याही पदाची आवश्यकता नाही यावर माझा दृढ विश्वास आहे. मला जसं शक्य होईल तशी मदत मी लोकांना करत असतेच. मी आणि मुख्यमंत्री दोघेही आश्वासन देतो की नामची सिंगिथांग मतदारसंघात नवीन उमेदवार हा समर्पित व्यक्ती असेल आणि तो मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठीही तत्पर असेल.

अठरावी लोकसभा : 78 टक्के ग्रॅज्यूएट, 37 टक्के व्यावसायिक अन् ‘MP’त आठवेळचा एकमेव खासदार

यानंतर कृष्णा कुमारी राय यांचे पती आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनीही एक पोस्ट लिहिली. एसकेएम पार्टीच्या संसदीय समितीच्या शिफारसीवर राय यांनी निवडणूक लढली होती. पक्षाचे कल्याण आणि उद्देशांना प्राधान्य देत सर्वानुमते निर्णय घेत त्यांनी राजीनामा दिल्याचे तमांग यांनी सांगितले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज