शपथविधीच्या तोंडावर शिंदेंना धक्का! मंत्रिपद न मिळाल्याने आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

शपथविधीच्या तोंडावर शिंदेंना धक्का! मंत्रिपद न मिळाल्याने आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नागपूर शहरात होत आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ज्या आमदारांना मंत्रि‍पदाची शपथ दिली जाणार आहे त्यांना फोन करून बोलावून घेण्यात आलं आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात एकूण 39 जणांचा शपथविधी होणार आहे. या घडामोडी घडत असतानाच शिंदेंना धक्का देणारी घडामोड घडली आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा दिला आहे.

शिंदेंची मोठी खेळी! तीन दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट; सहा नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. भाजपने १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही सरस कामगिरी केली. शिंदे गटाने ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

या नंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. कुणाला मंत्रिपद द्यायचं कुणाला डच्चू द्यायचा याची चर्चा सुरू झाली. अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली होती. त्यामुळे मंत्रिपद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. पक्षाच्या वरिष्ठांच्या मॅरैथॉन बैठका सुरू होत्या. खातेवाटपात रस्सीखेच दिसून आली तशीच रस्सीखेच मंत्रिपदातही दिसून आली. तसेच ज्यांना मंत्रिपदी संधी मिळाली नाही त्यांच्याकडून आता नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाराजीनाट्याची पहिली ठिणगी शिंदेंच्या शिवसेनेत पडली आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर मंत्रिपद न मिळाल्याने कमालीचे नाराज झाले आहेत. या नाराजीतच त्यांनी शिवसेनेच्या विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. महायुती सरकारचा शपथविधी सुरू असतानाच भोंडेकर यांनी राजीनामा दिल्याने या घडामोडीची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जळगावमध्ये ठरलं! भाजप, शिंदे अन् अजित पवार गटाच्या ‘या’ तिघांचं मंत्रिपद फिक्स

2019 मधील विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढलेल्या नरेंद्र भोंडेकर यांनी अरविंद भालधरे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत भोंडेकरांनी 23 हजार 677 मतांनी विजय मिळवला होता. तर 2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकीटावर लढून भोंडेकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 38 हजार 367 मतांनी पराभव केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube