Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान झाले बेपत्ता

Cloud Burst Sikkim : सिक्कीममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान झाले बेपत्ता

Cloud Burst Sikkim : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. या पुरात लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाल्याचीही माहिती मिळत आहे. या जवानांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. पावसामुळे येथील परिस्थिती सातत्याने हाताबाहेर चालली आहे.  

खळबळजनक : जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या; झोपेत असलेल्या चिमुरड्यांना अंथरुनातच घातल्या गोळ्या

पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आले. याचा परिणाम म्हणून खालच्या भागात पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली आहे. सिंगतमजवळ बारदांग येथे लष्कराची वाहने वाहून गेली. या दरम्यान जवळपास 23 जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. या जवानांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

सततच्या पावसाने तीस्ता नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  नदीला पूर आल्याने सिंगथम ब्रीज पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सिक्कीमच्या बहुतांश जिल्ह्यात परिस्थिती सातत्याने हाताबाहेर चालली आहे. रस्ते, पूल, बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेजारील त्रिपुरा राज्यातही कालपासून तुफान पाऊस सुरू आहे. तीस्ता नदीने धोक्याची पातळी पार केली आहे.

अचानक पूर परिस्थिती निर्माण झाली असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. लोकांच्या घरात आणि दुकानांतही पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गंगटोक आणि पाक्योंग जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ही दोन्ही शहरं सखल भागात येतात त्यामुळे येथे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षी होण्याची शक्यता मावळली

प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच मदतकार्यही वेगाने सुरू करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे. तसेच अन्य आवश्यक उपाययोजनाही तत्परतेने केल्या जात आहेत. प्रशासनाने येथील सर्वांनाच सावधनतेचा आणि खबरदारी घेण्याचा इशारा दिल आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube