Stree 2 Teaser: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा सिनेमा ‘स्त्री’ सुपरहिट झाल्यावर आता चाहत्यांना ‘स्त्री 2’ (Stree 2) ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. स्त्रीचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चाहत्यांना या सिनेमात हॉरर आणि कॉमेडी या दोन्हीचा आस्वाद मिलणार आहे. अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांनी या सिनेमात कॉमेडीचा तडका दिला होता.
राजकुमार रावने इंस्टाग्रामवर ‘स्त्री 2’ चा टीझर शेअर केला आहे. शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चंदेरीमध्ये पुन्हा एकदा दहशत पसरली…स्त्री 2 चे शूटिंग सुरू झाले आहे…ती येत आहे. ऑगस्ट 2024.’ यावेळीही ‘स्त्री 2’मध्ये राजकुमार रावसोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचे शूटिंग मध्य प्रदेशातील चंदेरी शहरात होत आहे. नुकतीच श्रद्धा कपूर शूटिंगसाठी मुंबई विमानतळावर दिसली. एवढेच नाही तर त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये चंदेरीला जाण्याची माहितीही दिली होती.
स्त्री हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्याचवेळी, ‘स्त्री 2’ च्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. श्रद्धा कपूरने शेवटची रणबीर कपूरसोबत ‘तू झुठी मैं मक्कर’मध्ये दिसून आली होती. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. राजकुमार राव बद्दल बोलायचे तर, तो शेवटचा ‘भिड’ मध्ये दिसला होता, जो 24 मार्च 2023 रोजी रिलीज झाला होता.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव आणि अपारशक्ती खुराणा याने ‘स्त्री 2’ बद्दल या व्हिडिओमध्ये आणखी एक अपडेट केले आहे. ‘स्त्री 2’ मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी दिसणार आहेत. श्रद्धा कपूरने देखील या हॉरर कॉमेडी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. परंतु, ‘ओ स्त्री कल आना’ ऐवजी ‘ओ स्त्री रक्षा करना’ सारखे डायलॉग पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. ‘स्त्री 2’ चित्रपटाची रिलीज डेट अजुन निर्मात्यांनी सांगितलेली नाही. तसेच व्हिडिओत हा सिनेमा ऑगस्ट 2024 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार असं सागंण्यात आलं आहे.
