Download App

Stree 2 Release Date: प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार श्रद्धाचा ‘स्त्री 2’

Stree 2 Release Date: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाचा ट्रेलर 18 जुलै (गुरुवार) रोजी रिलीज होणार आहे.

Stree 2 Trailer Release Date: राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) स्टारर ‘स्त्री 2’ (Stree 2 Movie) हा वर्षातील सर्वात प्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. निर्माते दुसरा भाग घेऊन येत आहेत आणि नुकताच त्याचा टीझरही रिलीज झाला आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहिली जात असून अखेर त्याची रिलीज डेट समोर आली आहे.


‘स्त्री 2’ चा ट्रेलर कधी रिलीज होणार?

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ चित्रपटाचा ट्रेलर 18 जुलै (गुरुवार) रोजी रिलीज होणार आहे. टीझरमध्ये चित्रपटाच्या कथानकाबद्दल फारसे काही उघड झाले नसले तरी ट्रेलर लॉन्चमुळे चित्रपटाची कथा आणि इतर माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार की ‘स्त्री 2’ चा ट्रेलर विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्कचा आगामी चित्रपट, बॅड न्यूजच्या थिएटर रिलीज दरम्यान संलग्न केला जाईल.

25 जून रोजी टीझर रिलीज

25 जून रोजी ‘स्त्री 2’ चा टीझर रिलीज झाला होता. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर टीझर पोस्ट करताना राजकुमार राव यांनी लिहिले होते, यावेळी स्वातंत्र्यदिनी चंदेरीमध्ये दहशत असेल. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी दंतकथा परत येत आहे. ‘स्त्री 2’ ती परत आली आहे. व्हिडिओची सुरुवात राजकुमार राव आणि इतरांनी एका महिलेच्या पुतळ्यावर दूध अर्पण केल्यापासून होते. यानंतर गावात गोंधळाचे वातावरण असून, ‘बाई परत आल्या’ असे सर्वजण वारंवार सांगतात. स्त्री भूमिकेत श्रद्धा कपूरची झलकही पाहायला मिळणार आहे. तमन्ना भाटिया देखील टीझरमध्ये दिसली होती.

बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी धडकणार तीन सिनेमे? अक्षय-जॉनला टक्कर द्यायला येतोय श्रद्धाचा ‘स्त्री 2’

‘स्त्री 2’ची स्टार कास्ट

पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक कलाकारांनी ‘स्त्री 2’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा हॉरर कॉमेडी चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us