बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी धडकणार तीन सिनेमे? अक्षय-जॉनला टक्कर द्यायला येतोय श्रद्धाचा ‘स्त्री 2’

बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी धडकणार तीन सिनेमे? अक्षय-जॉनला टक्कर द्यायला येतोय श्रद्धाचा ‘स्त्री 2’

Stree 2 Release Date: ओ स्त्री कल आना…आता उद्याची ही प्रतीक्षा संपणार आहे. महिला पुन्हा एकदा लोकांना घाबरवायला येत आहे. ‘स्त्री2’ (Stree 2)ची रिलीज डेट उघड झाली आहे. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), राजकुमार राव (Rajkummar Rao) यांचा ‘स्त्री 2’ हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी एका व्हिडिओसह सोशल मीडियावर (Social Media) चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तसेच या चित्रपटाचा टीझरही आज रिलीज करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)


‘स्त्री 2’चा टीझर पाहण्यासाठी तुम्हाला आधी मुंज्या पाहावा लागणार आहे. आता ‘स्त्री 2’ची टक्कर अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाशी होणार आहे.  व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की,या स्वातंत्र्यदिनी महिला पुन्हा येत आहे. ‘स्त्री 2’ 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. तुम्ही आजपासून चित्रपटगृहांमध्ये मुंज्यासोबत ‘स्त्री 2’चा टीझर पाहू शकणार आहे.

अक्षय-जॉनची टक्कर होणार

आता 1-2 नव्हे तर 15 ऑगस्टला तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘स्त्री 2’ व्यतिरिक्त, अक्षय कुमारचा मल्टीस्टारर ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेद’ देखील त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. त्यामुळे त्यांच्यातील क्लॅश पाहायला मजा येणार आहे. बॉक्स ऑफिसवर या तिघांपैकी कोण बाजी मारणार हे पाहणे बाकी आहे. यापूर्वी अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ आणि अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ देखील 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. परंतु आता त्यांच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

‘श्रीकांत’ मध्ये स्वतःला विसरला Rajkummar Rao निर्मात्यांनाही केलं प्रभावित

‘स्त्री 2’ बद्दल बोलायचे झाले तर वरुण धवन आणि तमन्ना भाटिया देखील यात खास भूमिका साकारणार आहेत. म्हणजेच श्रद्धा आणि राजकुमार राव यांच्यासोबतच चाहते वरुण आणि तमन्ना यांनाही चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी देखील या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजन यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube