‘श्रीकांत’ मध्ये स्वतःला विसरला Rajkummar Rao निर्मात्यांनाही केलं प्रभावित

‘श्रीकांत’ मध्ये स्वतःला विसरला Rajkummar Rao निर्मात्यांनाही केलं प्रभावित

Rajkummar Rao forgot himself for Shrikanth : अभिनेता राजकुमार राव ( Rajkummar Rao ) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता पुन्हा तो अशीच एक आगळी वेगळी भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये तो अंध असणार आहे. ‘श्रीकांत’ ( Shrikanth ) असं या चित्रपटाचं नाव आहे. या निमित्त त्याने आपण या पात्रामध्ये हरवलो असल्याचं राजकुमारने सांगितलं.

मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हा, कंटेट क्रिएटरर्सना पुनीत बालन यांचे आवाहन

‘श्रीकांत’ हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत भोल्लाच्या प्रेरणादायी प्रवासाभोवती असलेली गोष्ट आहे. ज्याने आपली दृष्टी कमजोर होऊ दिली नाही आणि अखेरीस बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली. 10 मे 2024 ला “अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी” हा चित्रपट रिलीज होणार आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित या आगामी बायोपिकमध्ये ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्यासोबत पॉवरपॅक परफॉर्मर स्क्रीन शेअर करणार आहे.

मूळ पवार अन् बाहेरचे पवार? शरद पवारांच्या विधानावर सुनेत्रावहिनींच ‘नो कमेंट्स’

तर राजकुमारने या चित्रपटाच्या शूटींगच्या वेळचा अनुभव सांगितला, तो म्हणाला की, सेटर आल्यावर मी राजकुमार न राहता श्रीकांत होण्यालाच प्राधान्य देतो. यावेळी त्याने शूटींगच्या वेळचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, निर्माते भूषण कुमार सेटवर आले होते. तेव्हा मी श्रीकांतच्या वेशात होतो. ते देखील मला पाहून प्रभावित झाले होते. त्यांनी माझं खूप कौतुकही केलं. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर राजकुमार राव ‘स्त्री 2’ हा चित्रपटातून लवकर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube