Rajkummar Rao: …म्हणून बॉलीवूडमधील दर्जेदार स्टार, अभिनेत्याची घोडदौड सुरुच

Rajkummar Rao: …म्हणून बॉलीवूडमधील दर्जेदार स्टार, अभिनेत्याची घोडदौड सुरुच

Rajkummar Rao : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने आतापर्यंत स्त्री, शादी में जरूर आना, बधाई हो’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (Social media) आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने करिअरमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि एक उत्तम स्टार म्हणून उदयास आला. बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याने दाखवून दिला.

‘काई पो चे!’ मधील त्याच्या ब्रेकआउट भूमिकेतून ‘शाहिद’, ‘न्यूटन’ आणि ‘ट्रॅप्ड’ सारख्या चित्रपटांमधील त्याच्या पॉवरहाऊस परफॉर्मन्ससाठी राजकुमार रावने सातत्याने असे परफॉर्मन्स दिले आहेत ज्यांचे केवळ समीक्षकांनीच तोंडभरून कौतुक केले नाही तर प्रेक्षकांनाही तो भावला आणि म्हणून पॉवरपॅक परफॉर्मर बनला.

याबद्दल बोलताना राजकुमार म्हणाला…

अभिनेता राजकुमार राव म्हणाला की, “माझ्यासाठी अभिनय हे प्रसिद्धी किंवा पैसा नाही तर पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू निर्माण करून त्यातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन कराव त्यातून त्यांना आनंद मिळावा अस मला वाटतं. राजकुमार राव यांची अष्टपैलुत्व त्यांची स्क्रिप्टची निवड आणि वैविध्यपूर्ण पात्रांना योग्य न्याय देण्याची त्यांची क्षमता हे त्याच वेगळेपण आहे. हा अभिनेता स्पॉटलाइट किंवा बिग-बजेट ब्लॉकबस्टर्सचा पाठलाग करणारा नसून एक कलाकार म्हणून त्याला आव्हान देणाऱ्या प्रकल्पांवर काम करण्यास प्राधान्य देतो.

Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार

राजकुमार राव हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. क्वीन, बरेली की बर्फी, हम दो हमारे दो, अलीगढ, लुडो, छलांग अशा अनेक सुपरहिट सिनेमांत त्याने काम केलं आहे. ‘द व्हाईट टायगर’ या सिनेमातील त्याच्या कामाचं या अनेकदा कौतुक होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यापासून ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवण्यापर्यंत राव यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. अभिनेता केवळ एक स्टार नाही तर खरा कलाकार आहे. राजकुमार राव त्याच्या कलाकृतीच्या सीमा पुढे घेऊन जात असताना तो त्याच्या दोन आगामी रिलीजची वाट पाहत आहे – ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’, जे 10 मे आणि 31 मे रोजी रिलीज होणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज