Shrikanth Release Date: राजकुमार रावच्या श्रीच नाव झालं ‘श्रीकांत’, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Shrikanth Release Date: राजकुमार रावच्या श्रीच नाव झालं ‘श्रीकांत’, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Rajkummar Rao Shrikanth Release Date: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. (Social Media) आता पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार रावने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्याच्या आगामी चित्रपटाचे नवीन शीर्षक आणि रिलीज तारखेची घोषणा केली असून पूर्वी याच नाव ‘श्री’ होत आणि आता ते “श्रीकांत” (Shrikanth Movie ) करण्यात आला आहे.

अभिनेता राजकुमारने सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून 10 मे 2024 ला “अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी” हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘श्रीकांत’ हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत भोल्लाच्या प्रेरणादायी प्रवासाभोवती असलेली गोष्ट आहे. ज्याने आपली दृष्टी कमजोर होऊ दिली नाही आणि अखेरीस बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली. एक उल्लेखनीय सत्य कथा जी तुमचे डोळे उघडणार आहे. राजकुमार राव यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टला कॅप्शन दिले आहे.

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित या आगामी बायोपिकमध्ये ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्यासोबत पॉवरपॅक परफॉर्मर स्क्रीन शेअर करणार आहे. ‘श्रीकांत’ व्यतिरिक्त, राव. ‘स्त्री 2’ मध्येही दिसणार आहे.

Sanya Malhotra: सान्या मल्होत्रा ​​पुन्हा दिसणार शाहरुख खानसोबत केलं खास काम

त्याच्याकडे ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘गन्स अँड गुलाब सीझन 2’ आणि ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ देखील आहेत.  ‘गन्स अँड गुलाब’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा झाल्यानंतर चाहते या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर राजकुमार राव ‘स्त्री 2’ हा चित्रपटातून लवकर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज