मूळ पवार अन् बाहेरचे पवार? शरद पवारांच्या विधानावर सुनेत्रावहिनींच ‘नो कमेंट्स’

मूळ पवार अन् बाहेरचे पवार? शरद पवारांच्या विधानावर सुनेत्रावहिनींच ‘नो कमेंट्स’

Baramati Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलं आहे. राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे (Baramati Loksabha) लागल्याचं चित्र आहे. कारण बारामतीमध्ये नणंद-भावजयी असा सामना होत आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यावरुन शरद पवार आणि अजित पवार गटाकडून एकमेकांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी होत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरुन मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार असा अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यावर आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी या विषयावर बोलणं टाळल्याचं दिसून आलं आहे.

मोठी बातमी : साताऱ्यात शिंदे विरूद्ध भोसले लढत होणार; भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी

काय म्हणाले होते शरद पवार?
अजित पवार यांनी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवार यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यामध्ये चुकीचं काही नाही. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी बाहेरुन आलेले पवार असा उल्लेख करताच पत्रकार परिषदेतील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. सोबतच शरद पवार यांनाही हसू आवरलं नसल्याचं पाहायला मिळालं आहे.

लोकसभा रणांगण! महायुती की आघाडी? सत्यजित तांबेच्या मनात काय?   

अजित पवार यांनी काय आवाहन केलं?
बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमदेवारी देण्यात आली आहे. बारामती मतदारसंघात शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच सुनेत्रा पवारांसाठी महायुतीकडून बारामतीमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, आत्तापर्यंत बारामतीकरांनी शरद पवारसाहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळी आता सुनेला निवडून द्या, आत्तापर्यंत पवारांच्या मागे बारामतीकर उभे राहिलेले आहेत, त्यामुळे सुनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं.

दरम्यान, अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांनी बाहेरुन आलेले पवार आणि मूळ पवार यावरून तुम्हाला यावर काय बोलायचं असं विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता ऐकून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसले होते. आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांनी या विषयावर बोलणं टाळलं असून राजकारणात कौटुंबिक नातं आणणं हे दुर्देवी असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube