Shraddha Kapoor सोबतचा ‘तो’ व्यक्ती कोण? अभिनेत्री नेमकं कोणाला करतेय डेट? जाणून घ्या…
Shraddha Kapoor Love Life: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे जोरदार चर्चेत असते. परंतु आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर (Social media) चांगलीच चर्चेचा आली आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’चे (Tu Jhoothi Main Makkaar) लेखक राहुल मोदी (Rahul Modi) यांच्याबरोबर श्रद्धा नुकतीच सिनेमा बघण्यासाठी गेली होती. यानंतर सोशल मिडीयावर त्यांच्या अफेयरबद्दल चांगलीच चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.
View this post on Instagram
चाहते असा अंदाज लावत आहेत की, अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आयुष्याला पुन्हा एकदा प्रेम मिळाले आहे. राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर एकमेकांना डेट करत आहेत, असा अंदाज चाहते लावत आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच राहुल मोदींबरोबर सिनेमा बघण्यासाठी आली होती. यावेळी दोघेही पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राहुल मोदीबरोबरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्यानंतर, चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे.
श्रद्धा कपूरच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका खास व्यक्तीसोबत प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा कपूर याअगोदर सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठबरोबर सुमारे ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर २०२२ मध्ये अभिनेत्री रोहनपासून लांब झाल्याची बातमी समोर आली आहे. राहुल मोदी हे श्रद्धा कपूरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या सिनेमाचे लेखक आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर त्यांच्या नात्यांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
मात्र राहुल अनेकदा श्रद्धा कपूरच्या कुत्र्यासोबतचे फोटो शेअर करत असतो. राहुल आणि श्रद्धाच्या या वाढत्या नात्याबद्दल चाहत्यांच्या देखील चांगलीच अपेक्षा वाढल्या लागले आहेत. श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीने नुकतेच राजकुमार रावसोबत ‘स्त्री २’चे शूटिंग सुरू असल्याची माहिती दिली आहे.