Download App

Subedar : स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या ‘सुभेदार’ तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची पहा झलक…

Subedar Movie: शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती.  दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ (Subedar Movie) हा सिनेमा २५ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ४ ऐतिहासिक सिनेमानंतर ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित असल्याचे दिसून येत आहे. आता नुकतंच या सिनेमातील एक पोस्टर समोर आले आहे. यामध्ये त्यांनी रायबाच्या लग्नाच्या तयारीतमध्ये गुंतलेल्या समस्त मालुसरे कुटुंबियांचा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे. आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर तान्हाजी मालुसरे.

स्वराज्याच्या सेवेतच्या कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचे देखील आजिबात भान नव्हते. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी मोठी गर्जना करत मोहीम जिंकून येणारे शूर योद्ध्याच्या कुटुंबानेही तितकीच मोलाची कामगिरी केली आहे. ‘सुभेदार’ या मराठी सिनेमात मालुसरे कुटुंबियांची पहिली झलक सोशल मीडियावर दाखवण्यात आली आहे. दिग्पाल लांजेकर यांनी इन्स्टाग्रामवर नुकतंच या सिनेमाचे एक पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये संपूर्ण मालुसरे कुटुंब बघायला मिळाला आहे.

त्यामध्ये त्यांची आई, बायको, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सदैव खंबीर साथ देणारे शेलारमामा चाहत्यांना दिसून येत आहे. यामध्ये सुभेदारांची भूमिका अभिनेता अजय पूरकर साकारत आहेत. तर त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या बायकोची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने साकारली असल्याचे दिसून येत आहे. तसेच सावलीप्रमाणे आपल्या थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंची दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, त्यांच्या बायकोची  म्हणजे यशोदाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळेने साकारली आहे. तर मालुसरे कुटुंबियांचा सर्वात मोठा आधारवड असणाऱ्या शेलारमामांची भूमिका समीर धर्माधिकारी याने साकारली आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

तान्हाजीरावांच्या आई म्हणजे पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख बघायला मिळाला आहे. तर सुभेदारांचा मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर असलयाचे बघायला मिळणार आहे. दरम्यान ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ या मराठी सिनेमाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. हा सिनेमा येत्या २५ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात धुमाकूळ घालणार अशी चर्चा चांगलीच रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. तर या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामुळे या सिनेमाची चाहत्यांना खूपच आतुरता लागली आहे.

 

Tags

follow us