Download App

Subhedarसाठी नागराजने घेतला महत्त्वाचा पुढाकार; सिनेमाच्या पहिल्या दिवशी केली एवढी कमाई!

Box Office Colletion : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘सुभेदार’ (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. शिवप्रेमी गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची चांगलीच प्रतीक्षा करत होते. अखेर 25 ऑगस्ट 2023 दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. प्रदर्शितच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ‘सुभेदार’ सिनेमामुळे नागराज मंजुळेंनी त्यांच्या ‘बापल्योक’ (Baaplyok) या मराठी सिनेमाची तारीख पुढे ढकलली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘सुभेदार’ या मराठी बहुचर्चित सिनेमान प्रदर्शितच्या पहिल्या दिवशी १.२ कोटींचा गल्ला कमावला आहे. तर दुसऱ्या दिवशी देखील हा सिनेमा १ कोटींची कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वीकेंडला हा सिनेमा ३ कोटींहून जास्त प्रमाणात कमाई करू शकणार आहे.

‘सुभेदार’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू दाखवली आहे. उत्तम कथा, पटकथा, दमदार संवाद, तगडी स्टारकास्ट आणि त्यांचा कमाल अभिनय, तंत्रकुशल टीम आणि चांगले दिग्दर्शन अशा सर्व गोष्टी जुळून आल्याने शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प चाहत्यांच्या जोरदार पसंतीस उतरलं आहे. ‘सुभेदार’ हा सिनेमा ३५० पेक्षा जास्त सिनेमागृहांतील ९०० पेक्षा जास्त शोजसह देशातल्या अनेक शहरांत आणि इतर ६ देशांत प्रदर्शित करण्यात आला आहे.

Subhedar Review: गनिमा कावा करणाऱ्यांकडून आत्मविश्वास शिकवणारा ‘सुभेदार’

या नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते असलेला ‘बापल्योक’ हा सिनेमा अगोदर २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु त्याच दरम्यान ‘सुभेदार’ सिनेमा प्रदर्शित झाल्याने या सिनेमाची प्रदर्शित तारीख पुढे ढकण्याचा निरयन हाती घेतला. मराठी मनोरंजनसृष्टीतील मंडळी कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहत असतातमी, हे नागराज मंजुळे यांच्या कृतीने दाखवून दिल्याचे बघायला मिळत आहे.

‘बापल्योक’ हा सिनेमा आता १ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाची आणि त्याच्या बापाची गमतीशीर गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. मकरंन माने यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. बाप आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा हा सिनेमा आहे.

Tags

follow us