Subhedar : ‘मावळं जागं झालं रं…’; ‘सुभेदार’ सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Subhedar Marathi Movie : शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) आगामी ‘सुभेदार’ (Subhedar) या सिनेमाची घोषणा केली. घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची मोठी प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमातील ‘मावळं जागं झालं रं…’ हे […]

Subhedar

Subhedar

Subhedar Marathi Movie : शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) आगामी ‘सुभेदार’ (Subhedar) या सिनेमाची घोषणा केली. घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची मोठी प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमातील ‘मावळं जागं झालं रं…’ हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.


अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) ‘मावळं जागं झालं रं’ (Maval Jaga Zala Re) या गाण्याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओ शेअर करत असताना त्यांनी लिहिले आहे की, १८ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा… सह्याद्रीला आज येतीया जाग, दख्खनचा गर्व ह्येर शिवाजी राजं… सादर आहे ‘सुभेदार’मधील पहिलं वहिलं आपल्या सर्वांचं गाणं ‘मावळं जागं झालं रं”. ‘सुभेदार’ हा सिनेमा अगोदर २५ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार होता. परंतु लोकाग्रहास्तव हा सिनेमा आता १८ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

चिन्मय मांडलेकर यांनी काल एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की “उद्या प्रदर्शित होणाऱ्या ‘मावळं जागं झालं रं’ गाण्यामध्ये तुम्हाला मिळणार एक आनंदाची बातमी”. आता सिनेमाची रिलीज तारीख बदलत ‘सुभेदार’च्या टीमने चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या ‘सुभेदार’ सिनेमातील गाण्यावर शिवराज अष्टकातील कोणतही गाणं ऐकलं की अंगावर शहारे येणार आहेत. जय जिजाऊ…जय शिवराय’, अशा कमेंट्स सध्या चाहते मोठ्या प्रमाणात करत आहेत. तसेच १८ ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार असल्याने मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करत आहेत. ‘मावळं जागं झालं रं’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे.

Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार माईंचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” प्रोमो समोर

या सिनेमात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. गेल्या काही दिवसापासून या सिनेमातील त्यांचा लूक आऊट करण्यात आला आहे. हातात तलवार, नजरेत धगधगनारी आग अशा त्यांच्या खतरनाक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चिन्मय मांडलेकर या सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सिनेप्रेमींना आता या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version