Download App

‘Subhedar’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, कारण सांगत चिन्मय मांडलेकर म्हणाला…

Subhedar Movie : मराठी बॉक्स ऑफिसवर (box office) कायम ऐतिहासिक सिनेमा गाजवणारा दिग्दर्शक म्हणजे दिगपाल लांजेकर. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर(Director Digpal Lanjekar) ‘शिवराज अष्टकाची निंर्मिती करत आहेत. त्यांनी आजपर्यंत फर्जंद, फत्तेहशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज हे सिनेमा प्रदर्शित केले आहेत. या सिनेमाना चाहते मोठ्या प्रमाणात भरभरून प्रेम दिले आहेत. ‘पावनखिंडने तर एक अनोखी कमाई केल्याचे आपण पाहिले आहेत.

यामध्ये अष्टकातील पाचवा सिनेमा ‘सुभेदार’ आता चाहत्यांच्या भेटीला येणार होता. त्याच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची वाट चाहते पाहत असतानाच आता त्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. सुभेदार हा सिनेमा नरवीर तान्हाजी मालुसरे (Tanhaji Malusare) यांच्या सिंहगडावरील पराक्रमावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेमध्ये अजय पुरकर झळकणार आहे.


या सिनेमातील बाकी स्टारकास्ट बऱ्यापैकी अगोदरच्या सिनेमातील आहे. हा ऐतिहासिक सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच १८ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु आता या सिनेमाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे. दिग्दर्शक, लेखक दिग्पाल लांजेकर यांनी या पोस्टमध्ये प्रदर्शित तारीख पुढे ढकलण्यामागचं कारण देखील सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर न्हाजी मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपण सर्वाना अनुभवता यावा याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत.

New Jersey : अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली!

परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नाहीत. परंतु आम्ही सुद्धा छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही हा सिनेमा तुमच्या भेटीला आणणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. यासाठी लागणार वेळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ दिनांक २५ ऑगस्ट २०२३ दिवशी प्रदर्शित करत आहोत’ अशी माहिती त्यांनी यावेळी चाहत्यांना दिली आहे.

‘सुभेदार’ या आगामी सिनेमात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेमध्ये शिवानी रांगोळे दिसून येणार आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त अशा सिनेमातील अजय पुरकर यांच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. आता अजय पुरकर यांच्या ‘सुभेदार’ या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘सुभेदार’ या सिनेमात चाहत्यांना तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली असल्याचे बघायला मिळत आहे. हा सिनेमा २५ ऑगस्ट २०२३ दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

Tags

follow us