Download App

‘योद्धाच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे, त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओतील पात्राने वेधलं लक्ष

Subodh Bhave Manapamaan Movie : सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ हा (Katyar Kaljat Ghusli) सिनेमा जोरदार गाजला होता. या सिनेमामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या सिनेमातील गाणी तितक्यात आवडीनं ऐकली जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला गेल्या वर्षी 7 वर्षे पूर्ण झाली होती. याच औचित्य साधून सुबोध भावेनं एका आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ( Manapamaan Movie) आणखी एक संगीतमय सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं सुबोधनं जाहीर केलं होतं. त्याचं संगीतमय सिनेमाचा व्हिडिओ पोस्ट करत त्याने याची माहिती दिली.


चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरिज यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुबोधने आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा उमटवलाय. सुबोधने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय. ‘मानापमान!’ असं या सिनेमाचं नाव असून याची निर्मिती जिओ स्टुडिओज् ने केली आहे. या सिनेमात सुबोध भावे एका योद्धाची भूमिका साकारली आहे. शंकर-एहसान-लॉय यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे.

तसेच मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सुबोध भावेच्या नावाचा समावेश होतो. मराठीमध्ये सर्वाधिक बायोपिक करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुबोधने आपले अनोखे स्थान निर्माण केले आहे. सुबोधने याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, यांच्यावर आधारित सिनेमात काम केलं आहे. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनावर आधिराज्य केले आहे. त्याच्या कट्यार काळजात घुसली, हदयांतर, विजेता, वाळवी, या सिनेमांना चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

HBD Kartik Aaryan: केक कापण्यापूर्वी कार्तिक आर्यनने ‘ही’ खास इच्छा केली व्यक्त, म्हणाले…

नव्या सिनेमाची घोषणा केल्यावर चाहत्यांनी त्याचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी त्याला शुभेच्छा देत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सुबोधचा सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नावाचा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याअगोदर त्यानं सुप्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्याबरोबर ताज – डिव्हायडेड बाय ब्लड नावाच्या वेबसीरिजमध्ये देखील काम केले आहे.

Tags

follow us