Subodh Bhave:’…अन् त्या वास्तूला भेट देण्याचा योग’, सुबोध भावेनं शेअर केली खास पोस्ट

Subodh Bhave: मराठी सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा त्याच्या अभिनयाने नेहमी चाहत्यांचे मनं जिंकत असताना दिसून येत असतो. सुबोध हा सोशल मीडियावर (Social media) अनेक विषयांवर आधारित पोस्ट शेअर करत असतो. सुबोध हा त्याच्या आगामी सिनेमाची माहिती देखील सोशल मीडियावरुन चाहत्यांना देत असतो. आज गुरुपौर्णिमेनिमित्त (Gurupurnima) सुबोधनं एक खास पोस्ट शेअर केले […]

Subodh Bhave

Subodh Bhave

Subodh Bhave: मराठी सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा त्याच्या अभिनयाने नेहमी चाहत्यांचे मनं जिंकत असताना दिसून येत असतो. सुबोध हा सोशल मीडियावर (Social media) अनेक विषयांवर आधारित पोस्ट शेअर करत असतो. सुबोध हा त्याच्या आगामी सिनेमाची माहिती देखील सोशल मीडियावरुन चाहत्यांना देत असतो. आज गुरुपौर्णिमेनिमित्त (Gurupurnima) सुबोधनं एक खास पोस्ट शेअर केले आहे. त्याच्या या पोस्टनं चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.


सुबोधने गुरुपौर्णिमेनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानं सिंदखेडराजा येथील काही फोटो शेअर करत  त्याला फोटोला कॅप्शन दिले आहे. आज गुरूपौर्णिमा, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी म्हणजे सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला, त्या वास्तूला भेट देण्याचा योग मला आला आहे. स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला, त्या पवित्र वास्तूच आणि आई जिजाऊं मातेचे आशीर्वाद घेतला आहे.

तसेच आई जिजाऊ आणि कळत-नकळत संस्कार करणार्‍या माझ्या सर्व गुरूंना मनापासून वंदन आणि साष्टांग नमस्कार…’ सुबोधनं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यांनी कमेंट करत, ‘खूप छान योग, गुरुपौर्णिमेनिमित आपणास आणि समस्त गुरुजनांस साष्टांग वंदन आणि शुभेच्छा…’ गेल्या काही महिन्यांअगोदर सुबोधचा फुलराणी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

या सिनेमाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. त्याच्या वाळवी या सिनेमाचे देखील अनेकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केलं आहे. या सिनेमामध्ये सुबोध यांच्या बरोबर स्वप्निल जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे या कालाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. सुबोधच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

तसेच सुबोधचा मोठा चाहता वर्ग आहे. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या सिनेमामधील सुबोधच्या अभिनयाचे अनेकांनी मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच तुला पाहते रे या सिरीयलमधून सुबोध चाहत्यांच्या भेटीस आला होता.

Exit mobile version