Download App

सुदीप्तो सेन यांच्या ‘चरक’ ची कान्समध्ये धमाल; भारतीय संस्कृतीला मिळालं जागतिक व्यासपीठ

Charak या चित्रपटातून सुदीप्तो सेन निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत. सिपींग टी सिनेमास या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जाणार आहे.

Sudipto Sen’s ‘Charak’ a hit at Cannes; Indian culture gets a global platform : 2025 चा सर्वात चर्चेत आलेला चित्रपट चरक या चित्रपटाने घोषणा झाल्यापासूनच प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. बोल्ड थीम आणि दमदार कथा असलेल्या या चित्रपटातून केरला स्टोरी साठी ओळखले जाणारे सुदीप्तो सेन या चित्रपटातून निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत. सिपींग टी सिनेमास या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जाणार आहे.

Narayan Rane : उद्धव अन् राज ठाकरेंवर राणेंचा प्रहार; म्हणाले, “दोघे भाऊ एकत्र आले तरी..”

हा चित्रपट फोल्कलोर हॉरर मिस्ट्री थ्रिलर असा सर्व मसाला एकत्र असणारा हा चित्रपट अत्यंत वेगळा आहे. या चित्रपटाची जादू आंतरराष्ट्रीय स्तरावरावर देखील पाहायला मिळत आहे. कारण या वर्षाच्या सुरूवातीलाच या चित्रपटाने बर्लिन फिल्म फेस्टीवलमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. 2025 च्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये देखील त्याने सर्वांना इम्प्रेस केलं. कान्स 2025 मध्ये जेव्हा चरकचं स्क्रीनिंग एका खचाखच भरलेल्या ऑडिटोरियम मध्ये झालं होतं. तेथील वातावरण पाहण्या जोग होतं. येथे या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

ज्येष्ठ कवी गुलजार यांना ज्ञानपीठ प्रदान! लेखक अरूण शेवतेंकडून खास फोटो शेअर

क्रिटिक्सने चित्रपटाची प्रचंड प्रशंसा केली. अनेकांनी या चित्रपटाला एक चांगला विचार आणि व्हिजन म्हटलं. तर सेन यांच्याबद्दल बोलताना त्यांना सध्या देशातील स्रवात जास्त प्रॉमिसिंग चित्रपट निर्माते असल्याचं म्हटलं आहे. तर कान्समध्ये चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादावर सेन यांनी म्हटलं की, मला अत्यंत आनंद झाला आहे. हा आपल्या भारतीय संस्कृतीचा विजय आहे. ज्यामुळे मायथॉलॉजीची ताकद आणि महत्त्व जगाला कळालं. तसेच कान्समध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाला आणखी मजबूती मिळाली. त्यामुळे मी ज्युरी आणि प्रवेशकांचे आभार मानतो.

मोदी, शाह, फडणवीसांचं नावं घेऊ नका! नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना सज्जड दम

चरक ची कथा गुढ आणि रहस्यमय परंपरा चरक पूजेवर आधारित आहे. जी बंगाल, बिहार आणि ओरिसाच्या काही भागांमध्ये साजरी केली जाते. तेसच या चित्रपटातून भक्तीच्या नावाखाली केलेली अंधश्रद्धा ही मानुसकीला काळिमा फासते. या चित्रपटाची निर्मिती सुदीप्तो सेन, दिग्दर्शन शीलादित्य मौलिक आणि लेखन संजय हलदर यांनी केलं आहे.

follow us