मोदी, शाह, फडणवीसांचं नावं घेऊ नका! नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना सज्जड दम

मोदी, शाह, फडणवीसांचं नावं घेऊ नका! नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना सज्जड दम

Narayan Rane Warning To Aditya Thackeray : खासदार नारायण राणे यांनी (Narayan Rane) आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर (Aditya Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईत पहिल्याच पावसाने मोठा दाणादाण उडाली. याचा सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला. भुयारी मेट्रोत देखील पाणी शिरलं. यावरून मात्र विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना घेरलंय. पंतप्रधान मोदी (PM Modi), गृहमंत्री शाह अन् देवेंद्र फडणवीस यांच्यावर आदित्य ठाकरे (Amit Shah) टीका करीत आहेत. यावरूनच खासदार नारायण राणे यांनी ठाकरेंना सज्जड दम दिलाय.

सॅनहोजेत जुलैमध्ये दुसरा ‘नाफा’ चित्रपट महोत्सव; अमेरिकेत दिसणार मराठी सिनेमांची जादू

पहिल्याच पावसात मेट्रोचे धिंडवडे निघाले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी (Maharashtra Politics) मेट्रो स्टेशनची पाहणी केली. त्यांनी महायुती अन् भाजपवर निशाणा साधला. नगरसेवकांना फोडण्यासाठी जो पैसा वापरला गेला, तो मुंबईकरांचा होता. त्यामुळे जनतेचे हाल झाले, असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

यावरून आता खासदार नारायण राणे (Narayan rane) यांनी आदित्य ठाकरेंना थेट इशाराच दिल्याचं समोर आलंय. आदित्य ठाकरे, तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस, तर याद राख, असं नारायण राणे यांनी म्हटलंय. दिनो मोर्चा कोण? आदित्य त्याच्याकडे का येतो? काय करतात, ही सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी शांत आहे. मोदी, शाह, फडणवीस यांची नावे घेऊ नका, असं देखील नारायण राणे यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, राजवट अन् पाऊस… तरी मुंबई बुडाली नव्हती, नारायण राणेंची तुफान फटकेबाजी

नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना देखील एक प्रकारे इशाराच दिला आहे. त्यांनी म्हटलं की, काल मुंबईत अतिवृष्टी झाली, विरोधकांमध्ये हाहाकार उडाला आहे. पत्रकारांना बिझी केलंय. 26 मे रोजी मुंबईत 252 मिमी पाऊस पडला. पण एक आठवण करून देतो. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 944 मिमी पाऊस पडला होता. त्यावेळी 27 तारखेला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, ठाकरेंची राजवट असताना पाऊस पडला होता, तरी मुंबई बुडाली नव्हती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube