उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, राजवट अन् पाऊस… तरी मुंबई बुडाली नव्हती, नारायण राणेंची तुफान फटकेबाजी

Narayan Rane On Aaditya Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Rain : मुंबईत काल अतिवृष्टी (Mumbai Rain) झाली. विरोधकांमध्ये हाहाकार उडाला आहे. पत्रकारांना बिझी केलंय. 26 मे रोजी 252 मिमी पाऊस मुंबईत पडला. आदित्य (Aaditya Thackeray), उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) एक आठवण करून देतो. 26 जुलैला 944 मिमी पाऊस पडला होता. 27 तारखेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता. त्यांची राजवट असताना पाऊस पडला, तरी मुंबई बुडाली नव्हती, असं खासदार नारायण राणे यांनी (Narayan Rane) म्हटलंय.
काल आदित्य एवढा फिरला, कुठेही भिजला नाही. लोक चालताना दिसत होते. आदित्य आणि उद्धव ठाकरे मुंबईचा भौगोलिक नकाशा पाहा. समुद्र वर अन् जमिन खाली म्हणून पाण्याचा निचरा होत नाही. 26 वर्षे सत्ता होती, मग का प्लांट उभारले नाहीत? असं देखील त्यांनी विचारलं आहे.
ठाकरे सेनेला धक्का! पुण्यात शिंदेंची दमदार वाटचाल; सुषमा अंधारेंच्या निकटवर्तीयाची संघटकपदी वर्णी
अनेकवेळा मागील काळातील फोटो दाखवतात, हे मी पाहिले आहे. हिंदमाताचे फोटो दाखवले जातात. 2005 साली महापालिकेत कुणाची सत्ता होती? मिठी नदी नव्हती का? आता आली का? तेव्हा साफ केली होती का? तरी पण पाणी का भरले? वस्त्यांमध्ये पाणी का गेले? तुझे किती वय होते? आठवण कर, काहीही बोलतो. कमाईचे साधन निर्माण करण्यासाठी काहीही बोलतो, अशी टीका नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलीय.
मोदी, फडणीस, मिंधे यांच्यामुळे भुयारी मेट्रो बुडाली. रस्त्यावर शिवसैनिकांनी उतरा. आज चालता येत नाही, एवढे शिवसैनिक आहेत. एकही दिसत नाही. एक तरी प्रसंग का दाखवला नाही, सामनामध्ये फोटो का दाखवला नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
1 ऑगस्टपासून UPI वर बॅलन्स चेकींग अन्ऑटो पेवर लिमिट! दिवसातून किती संधी मिळणार? जाणून घ्या…
कोकणात 5 हजार मिमी पाऊस पडतो. चेरापुंजीनंतर कोकणात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतो. अर्ध्या तासात समुद्रात जाते पाणी. सरकारला अन् लोकांना मदत करायची, तर राजकारण करतात. आम्ही नक्कल केली तर काय होईल. तुमचे चेहरे बघा मग दुसऱ्यावर टीका करा. तुम्ही किती बुडालेल्या लोकांना मदत केली? ते सांगा. उद्धव ठाकरेंच्या राशीत मदत शब्द आहे का?
सारखे मोदी व शाह यांचे नाव घेता. आदित्यने अजून बाळसं घेतले नाही. तू अडचणीत येशील. संजय राऊतच्या नादी लागू नको, असा सल्ला देखील त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलाय. भ्रष्टाचार केला म्हणून जेलमध्ये गेला आणि पुस्तक काढलं, असा टोला त्यांनी संजय राऊतला लगावला आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेत चौथ्या क्रमांकावर आला. तू खासदार आहेस ना, तुला कळतं का? असं देखील नारायण राणे यांनी विचारलं आहे.