Download App

जेलमधून सुकेश चंद्रशेखरचं ‘जॅकलिनला पत्र, म्हणाला, ‘मी माझ्या सीतेसाठी…’

आताही सुकेश चंद्रशेखरने जेलमधून जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलंय. एवढेच नाही तर त्याने आपल्या प्रेमाला रामायनाची उपमा दिली.

  • Written By: Last Updated:

Sukesh Chandrashekhar : महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सुकेशवर एक हजाराहून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, अटक झाल्यानंतर सुकेश तुरुंगातून जॅकलिनला अनेकदा प्रेमपत्र पाठवत असतो. आताही सुकेशने जेलमधून जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) पत्र लिहिलंय. एवढेच नाही तर त्याने आपल्या प्रेमाला रामायनाची उपमा दिली.

राष्ट्रवादीची भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट, मी किंवा राष्ट्रवादीने…; मलिकांनी थेट सांगितलं… 

श्रीराम जसा सीतेसोबत वनवासातून परतला होता, त्याचप्रमाणे माझी सीता जॅकलिनसाठी मी देखील या छोट्या वनवासातून परत येईन, असं त्याने या पत्रात म्हटलं. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिलंय

सुकेश सध्या 200 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात आहे. जेलमधूनच त्याने जॅकलिनला हे पत्र लिहिले आहे. खरंतर सुकेशने तुरुंगातून जॅकलिनला पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही त्याने जॅकलिनला पत्र पाठवलं होतं. आधीच्या पत्रात सुकेशने जॅकलिनच्या चाहत्यांनाच २०० महिंद्रा थार कार आणि आयफोन १६ प्रो मॅक्स गिफ्ट करणार असल्याचे सांगितले होतं. या गिफ्टविषयीही त्याने या पत्रात उल्लेख केला. एवढेच नाही तर या गिफ्टची शेवटची तारीखही त्याने सांगितली आहे.

सेम टू सेम! पुण्यातील पर्वती मतदारसंघात एकाच नावाच्या उमेदवाराचे तीन अर्ज 

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पत्र लिहितं म्हटलं की, श्रीराम जसा सीतेसोबत वनवासातून परतला होता, त्याचप्रमाणे माझी सीता जॅकलिनसाठी मी देखील या छोट्या वनवासातून परत येईन. आमच्यात काय आहे, याची कल्पना जगाला नाही… आमची प्रेमकहाणी काल, आज आणि उद्याही एक आदर्शच ठरणार आहे आणि आमच्या सारख्या वेड्यांना जग कायमच लक्षात ठेवेन. चाहत्यांना त्यांचं गिफ्ट मिळण्याची अंतिम मुदत 25 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सुकेशने पत्राच्या शेवटी जॅकलिनचा ‘राम’ असं लिहिलं आहे.

दरम्यान, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला एकूण 5 प्राणी भेट दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये 52 लाख रुपये किमतीचा एक अरबी घोडा आणि 9 लाख रुपये किमतीच्या चार पर्शियन मांजरींचाही समावेश आहे, ज्याची एकूण किंमत 36 लाख रुपये आहे, ही सर्व माहिती ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

follow us