मोठी बातमी! महाठग सुकेश चंद्रशेखरला मोठा दिलासा, दिल्ली कोर्टाकडून जामीन मंजूर

मोठी बातमी! महाठग सुकेश चंद्रशेखरला मोठा दिलासा, दिल्ली कोर्टाकडून जामीन मंजूर

Sukesh Chandrashekhar: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार महाठग सुकेश चंद्रशेखरला (Sukesh Chandrashekhar) दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) जामीन मंजूर केला आहे. माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखरला दो पट्टी निवडणूक चिन्हाशी संबंधित लाच प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतरही त्याला तुरूंगातून बाहेर येता येणार नाही. याचा कारण म्हणजे त्याला दुसऱ्या प्रकरणात जामीन मिळालेला नाही.

माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पीएमएलए आणि दिल्ली पोलिसांशी संबंधित मकोका प्रकरणात सुकेश चंद्रशेखरवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे लाच प्रकरणात जामीन मिळूनही त्याला तुरूंगातून बाहेर येता येत नाही. सुकेश चंद्रशेखरवर लाचखोरीपासून तब्बल 200 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सध्या सुकेश चंद्रशेखर दिल्लीच्या तिहार तुरुंगात असून आता जामीन मिळाल्यानंतरही तो त्याच तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. सुकेशसोबत तिहार तुरुंगात तिची पत्नी लीना मारियाही तिहार तुरुंगात असून तिच्या जामीनाबाबत झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांनी विरोध केला होता. जर मारियाला जामीन मिळाल्यास ती देशातून पळून जाऊ शकते, असा दावा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला होता.

काय आहे

प्रकरण माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखरवर सरकारी अधिकारी म्हणून फार्मास्युटिकल कंपनी रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर मोहन सिंग (Shivinder Mohan Singh) यांची पत्नी अदिती सिंग यांच्याकडून जबरदस्तीने सुमारे 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांनो, LPG पासून क्रेडिट कार्डपर्यंत 1 सप्टेंबरपासून ‘हे’ 5 मोठे बदल होणार

मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या शिविंदर मोहन सिंग यांना सोडवण्याच्या नावाखाली आदिती सिंगची फसवणूक सुकेशने केली आहे असा आरोप करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube