नागरिकांनो, LPG पासून क्रेडिट कार्डपर्यंत 1 सप्टेंबरपासून ‘हे’ 5 मोठे बदल होणार

नागरिकांनो, LPG पासून क्रेडिट कार्डपर्यंत 1 सप्टेंबरपासून ‘हे’ 5 मोठे बदल होणार

September 2024 New Rules: रविवारपासून सप्टेंबर (September 2024) महिन्याची सुरुवात होणार आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशात पाच मोठे बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशात कोणते नवीन नियम लागू होणार हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.

कोणते नियम बदलणार

एलपीजी सिलेंडरची किंमत

माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती. माहितीनुसार या महिन्यात व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या किमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

CNG-PNG आणि ATF दरांमध्ये बदल

तर दुसरीकडे एव्हिएशन टर्बाइन फ्लूल (ATF ) आणि सीएनजी-पीएनजीच्या दरांमध्ये देखील 1 सप्टेंबरपासून बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम वाहतूक खर्च आणि इतर वस्तूंच्या किमतींवर होणार आहे. या बदलाचा सर्वात मोठा परिणाम कार मालक, पीएनजी ग्राहक आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांना ग्राहकांवर होणार आहे.

नवीन क्रेडिट कार्ड नियम

याच बरोबर 1 सप्टेंबरपासून नवीन क्रेडिट कार्ड नियम देखील लागू होणार आहे. माहितीनुसार, 1 सप्टेंबरपासून HDFC बँकेने युटिलिटी बिल पेमेंटसाठी रिवॉर्ड पॉइंट्ससाठी मर्यादा लागू केली आहे तर IDFC फर्स्ट बँकेने पेमेंट नियम बदलले आहेत.

फेक कॉल्सवर कडक कारवाई

फेक कॉल आणि मेसेजच्या विरोधात देखील 1 सप्टेंबरपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. टेलीमार्केटिंग कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत नवीन ब्लॉकचेन-आधारित प्रोसेस बदलावी लागणार आहे. ज्यामुळे ग्राहकांची सुरक्षा वाढेल आणि स्पॅम कॉल्स कमी होणार आहे.

मोफत आधार अपडेटची तारीख वाढवली

तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे. तुम्हाला आता ही सुविधा 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मिळणार आहे. यापूर्वी ही तारीख 14 सप्टेंबरपर्यंत होती. त्यामुळे UIDAI ने नागरिकांना लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

हरियाणात भाजपला धक्का, मोदी मॅजिक ठरणार फेल? जाणून घ्या नवीन ओपिनियन पोल

महागाई भत्ता

केंद्र सरकार देखील सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा गिफ्ट देऊ शकते. माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकार महागाई भत्त्यात म्हणजेच डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. केंद्र सरकार यावेळी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube