मनोज जरांगेंनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार, 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार
Manoj Jarange Hunger Strike : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange ) यांनी आरक्षण मिळवण्यासाठी अनेक लढे-आंदोलनं केली तरी अद्याप आरक्षणाचा तिढा सुटला नाही. अशाच आता मनोज जरांगेनी पुन्हा एकदा आमरण उपोषण ( Hunger Strike ) करण्याचा निर्धार केला आहे. 29 सप्टेंबरपासून जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार, असा निर्धारही त्यांनी केला. ते आज अंतरवली सराटीमध्ये बोलत होते.
Bigg Boss Marathi : अभिजीत गुरुंनी सांगितलेली ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या तुम्ही ऐकली का?
मनोज जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, 29 सप्टेंबरपर्यंत सरकार काय निर्णय घेते ते बघू, यांना आता आपण बघूच, यांना निवडणुकीमध्ये पण पाडू… त्यांचे 113 आमदार आपण निवडून येऊ देत नाहीत. पाडू म्हणजे पाडूच. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची, काय व्हायचं ते होई दे, असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला.
ते म्हणाले, सरकारकडे 29 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. एक वर्षात माझ्या समाजाचा तोटा झाला. आता आरक्षणासाठी एक कुटुंब गेलेतरी चालतं. आपल्या जातीचं कल्याण तरी होईल. लाखो कुटुंबे वाचतील. ही आरपारची लढाई लढायची. 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण होणार म्हणजे होणारच, मागे हटायचं नाही. मी महिनाभर महाराष्ट्रात फिरणार आहे. मी सर्व तालुक्यांमध्ये जाणार आहे. 29 सप्टेंबरला सगळा महाराष्ट्र एक होईल, असं जरांगे म्हणाले.
Sushma Andhare : पोल्ट्री फार्म ते खासदारकी; सुषमा अंधारेंनी राणेंचा इतिहासच काढला
दरम्यान, जरांगेंनी उपोषणाची घोषणा करताच अंतवली सराटीत हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जरांगेंनी पुन्हा उपोषण करु नये अशी त्यांना अनेकांनी केली. तर काही महिल्यांच्या डोळ्यांना पाणी आलं. कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, हे स्त्यावरच्या लढाईला घाबरत नाहीत. 29 सप्टेंबर पर्यंत देवेंद्र फडणवीसांकडे वेळ आहे. बघू यांना मराठा समजाासाठी माया आहे का नाही? नाही तर 29 सप्टेंबरपासून आपण आरपार लढाई करू. तेव्हा आपण ठरवू काय करायचं ते. मी समाजाला शब्द दिला होता की, मी मागे हटणार नाही. गेल्या एक वर्षापासून मी हटलेलो नाही. माझ्या समाजाला वर्षभरापासून त्रास होत आहे. माझ्या समाजाची बलिदानं गेली. मराठा आरक्षणासाठी कित्येक बहिणींचं कुंकू पुसलंय. कोटीने मराठा समाज रस्त्यावर आहे. मला हे सहन होत नाही. त्याच्यामुळेच 29 सप्टेंबर रोजी हे आमरण उपोषण आरपार होणार आहे, असं जरांगे म्हणाले.