Download App

Milan Luthria: मिलन लुथरियाच्या दिग्दर्शनाच्या बंपर यशानंतर ‘सुलतान ऑफ दिल्ली’ चा सीझन 2 येणार?

Milan Luthria On Sultan of Delhi Season 2: मिलन लुथरियाची (Milan Luthria) यांची वेब सिरीज (Web Series), ‘सुलतान ऑफ दिल्ली’ ने (Sultan of Delhi) अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांची मन जिंकली. त्याच्या आकर्षक कथानकाने आणि उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ही वेब सीरिज नक्कीच कमालीची ठरली वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन येऊन ती आकर्षक ठरली आहे.


लुथरियाचे उत्कृष्ट दिग्दर्शन उत्तम स्टार कास्ट याला सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे. यामधील पात्र आणि कथा याची प्रशंसा सगळेच करतात. शोचे यश केवळ त्याच्या थरारक कथानकाच्या ट्विस्टमध्येच नाही तर प्रतिभावान कलाकारांनी सादर केलेल्या आकर्षक कामगिरीमध्येही आहे.

सीझन 1ने प्रेक्षकांना आपलंसं तर केलं, पण आता चाहत्यांना उत्सुकता आहे. ती म्हणजे सीझन 2 ची. मिलन लुथरियाच्या या कथाकथनाने डिजिटल मनोरंजनाच्या लँडस्केपवर एक अनोखी छाप सोडली आहे. यामुळे त्याला प्रशंसा मिळाली आणि आता सगळेच नव्या सीजनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लुथरिया पुन्हा एकदा नवा सीजन घेऊन येणार का? हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Katrina Kaif अन् विकी कौशलच्या ‘मेरी क्रिसमस’ची रिलीज डेट पुन्हा लांबणीवर ; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

गेल्या काही दिवसापूर्वी प्रसिद्ध सिनेमा निर्माते मिलन लुथरिया  यांनी अलीकडील ‘सुलतान ऑफ दिल्ली’ (Sultan of Delhi) या वेब सीरिजमधील दुसर्‍या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा एक अनुभव शेअर केला आहे. लुथरिया यांनी दिग्दर्शकासोबत प्रभावीपणे एकत्र कसे काम करू शकतात. याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आणि त्यांनी सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेतला.

‘सुलतान ऑफ दिल्ली’ या वेब सीरिजची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. OTT ओटीटी गाणी प्रदर्शित करण्‍याची निवड करणे ही एक अनोखी शक्कल आहे. परंतु ती सुलतान ऑफ दिल्लीमध्ये हे गाणं नक्कीच वेगळं ठरणार आहे. हे गाणं 13 ऑक्टोबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टार वर ही वेब सीरिज स्ट्रीमिंगसाठीबघायला मिळत आहे.

Tags

follow us