Border 2: 1997 मध्ये रिलीज झालेल्या सनी देओलच्या (Sunny Deol) मल्टीस्टारर वॉर चित्रपट ‘बॉर्डर’च्या सिक्वेलची (Border Sequel) बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. सनीने ‘गदर 2’ मधून दमदार कमबॅक केल्यावर ‘बॉर्डर 2’ चीही (Border 2) चर्चा सुरू झाली. या वर्षी जूनमध्ये, निर्मात्यांनी टीझरद्वारे अधिकृतपणे चित्रपटाची घोषणा केली होती, परंतु सनी देओल व्यतिरिक्त, चित्रपटात इतर कोणकोणते स्टार्स दिसणार आहेत याबद्दल बर्याच दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगत आहे. निर्मात्यांनी अजून कोणाला कास्ट करण्याबाबत कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. पण आता चित्रपटाच्या निर्मात्याने कलाकारांबद्दल मोठी माहिती दिली आहे.
‘बॉर्डर’ चित्रपट बनवणारे जेपी दत्ता यांचे जावई आणि बॉर्डर 2 चे निर्माते बिनॉय के गांधी यांनी चित्रपटाशी संबंधित काही महत्त्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. बॉर्डर 2 ची निर्मिती जेपी दत्ता, त्यांची मुलगी निधी दत्ता आणि तिचा पती बिनॉय यांनी संयुक्तपणे केली आहे. सध्या बिनॉय त्याच्या पुढच्या ‘घडचडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. दरम्यान, बॉलीवूड हंगामाशी बोलताना त्याने बॉर्डर 2 बाबत अपडेट दिले आहे.
स्टारकास्टची घोषणा होणार
चित्रपटातील स्टारकास्टबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की ‘बॉर्डर 2’ मध्ये सनी देओलसोबत आयुष्मान खुराना आणि दिलजीत दोसांझ सारखे कलाकार देखील दिसणार आहेत. पण बिनॉय यांनी या वृत्तांवर भाष्य केले नाही. तो म्हणाला, “लवकरच स्टारकास्टची घोषणा केली जाणार आहे. या महिन्यातच, आम्ही एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहोत, जिथे आम्ही सर्व स्टार कास्ट त्यांच्या पात्रांसह आणि गेटअप्सची ओळख करून देणार आहोत.
Naad Movie: रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ‘नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित
निधी दत्ताने ‘बॉर्डर 2’ ची स्क्रिप्ट लिहिली
चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल तो म्हणाला, “आम्ही सर्वजण बॉर्डर 2 पाहत मोठे झालो आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्हा सर्वांना लष्कराचा भाग व्हायचे होते. ‘बॉर्डर 2’ वर सर्व काही ठीक चालले आहे. माझी पत्नी निधी दत्ताने चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया होती ‘वाह’, ‘तुझ्या वडिलांनी अप्रतिम स्क्रिप्ट लिहिली आहे’. तेव्हा त्यांनी खुलासा केला की हे मीच लिहिले आहे. माझा विश्वासच बसत नव्हता. मग तिच्या सहाय्यक लेखकाने याबद्दल खरं काय आहे ते सांगून टाकलं आहे.
हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे बिनॉयने सांगितले. त्याने सांगितले की एक मुलगी ज्याला प्रत्येक जुलैमध्ये डिस्ने लँडला जायचे आहे आणि ती अचानक बॉर्डरसाठी एक उत्तम स्क्रिप्ट लिहिते. अशा प्रकारे सिक्वेलचा प्रवास सुरू झाला. आता यावर मोठे काम सुरू आहे. तिने सांगितले की तो नोव्हेंबरमध्ये ‘बॉर्डर 2’ चे शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहे. काही काळापूर्वी असे सांगण्यात आले होते की हा चित्रपट 23 जून 2026 रोजी रिलीज होणार आहे.