Karan Deol Wedding : शुभमंगल सावधान! करण देओल अन् द्रिशा आचार्यचा शाही विवाहसोहळा संपन्न

Karan Deol Wedding : शुभमंगल सावधान! करण देओल अन् द्रिशा आचार्यचा शाही विवाहसोहळा संपन्न

Karan Deol Drisha Acharaya Wedding: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा नातू आणि सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण याच्या लग्नाची सध्या चांगलीच जोरदार चर्चा सुरु आहे. (Bollywood) आज करण द्रिशा आचार्यसोबत विवाहबंधनात अडकला आहे. करण आणि द्रिशाच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)


करण देओलने (Karan Deol) त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यबरोबर (Drisha Acharya) लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर दोघांचा फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये करण आणि द्रिशा वधू-वरांच्या जोडीमध्ये खूप सुंदर दिसून येत आहेत. लग्नाच्या वेळी द्रिशाने लाल रंगाच्या लेहंगा घातला आहे. तर करणने क्रीम रंगाची शेरवानी आणि त्याला जुळणारी पगडी घातली आहे.

गेल्या ३ दिवसांपासून करणच्या लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात झाली आहे. यादरम्यान अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. धर्मेंद्र यांच्यासह सनी देओल देखील लेकाच्या लग्नाचा आनंद घेत आहेत. त्यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये करण घोड्यावरुन लग्नमंडपात जात असल्याचे दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर धर्मेंद्र, सनी तसेच देओल कुटुंबियांनी वरातीत डान्स करण्याचा आनंद घेतला आहे.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

या वरातीमध्ये धर्मेंद्र देखील आनंदाने नाचत असल्याचे दिसून आला. तसेच वरातीतील मंडळींच्या पारंपरिक लूकने चांगलेच लक्ष वेधलं आहे. धर्मेंद्र त्यांच्या नातवाच्या वरातीत आनंदाने नाचत आहेत, ते बघून चाहते देखील त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. लेकाच्या वरातीमध्ये सनी देओलचा स्वॅग बघून त्याच्या लूकचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तर बॉबी देओलने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने सनी लेकाचं लग्न करत आहे, हे पाहून चाहते देओल कुटुंबियांचं कौतुक करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube