Download App

‘दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे’; सनीच्या ‘Maa Tujhe Salaam 2’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी पाजी (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने ३५० कोटींहून जास्त गल्ला केल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी ‘माँ तुझे सलाम 2’ (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे .

‘माँ तुझे सलाम’ हा सिनेमा २५ जानेवारी २००२ मध्ये चाहत्यांच्या भेटीला आल्याचे आपण पहिले आहे. या सिनेमात सनी पाजी, तब्बू,अरबाज खान आणि टिन्नू वर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात ‘माँ तुझे सलाम 2’ या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.

‘माँ तुझे सलाम 2’ या सिनेमाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. सिनेविश्लेषक अतुल मोहन यांनी या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला. पोस्टर शेअर करत त्यांनी सांगितले आहे की,”दुध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगो तो लाहौर भी छीन लेंगे”. लवकरच थरारक असा अॅक्शनचा तडका असणाऱ्या या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Vivek Agnihotri: ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल सवाल करताच अग्निहोत्रींचा काढता पाय; Video Viral…

सनी पाजीच्या ‘गदर 2’ हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘माँ तुझे सलाम 2’ या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘माँ तुझे सलाम 2’ हा सिनेमा देखील लवकरच ५०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याचे सांगितले  जात आहे. अद्याप या सिनेमाबद्दल अधिक माहिती समोर आली नाही. आता ‘गदर 2’ सिनेमाला मिळालेलं यश लक्षात घेत ‘माँ तुझे सलाम’चा सीक्वेल प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्याचं सांगितले जात आहे. महेंद्र धारीवाल या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं पोस्टरमध्ये दिसून आले आहे.

Tags

follow us