सनी देओलचा ‘गबरू’ धमाका! प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, जाणून घ्या तारीख…

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनी देओलने चित्रपट ‘गबरू (GABRU)’ जगासमोर आणला आहे.

Sunny Deol Unleashes Gabru

Sunny Deol Unleashes Gabru

Sunny Deol Unleashes Gabru on His Birthday : ‘गदर 2’ आणि ‘जाट’ या गगनभेदी यशानंतर, तसेच ‘बॉर्डर २’, ‘सूर्या’, ‘गब्बरू’, ‘लाहोर 1947’, नेटफ्लिक्स ओरिजिनल ‘इक्का’ आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या एका नव्या चित्रपटासह सनी देओल आपल्या करिअरच्या नव्या टप्प्यावर सज्ज झाला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनी देओलने आपल्या सर्वांत भावनिक भूमिकेचा असलेला पुढील चित्रपट ‘गबरू (GABRU)’ जगासमोर आणला आहे.

‘गब्बरू’ हा एक हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि जीवन साजरे करणारा चित्रपट आहे. जो सनी देओलचा (Sunny Deol) आतापर्यंतचा सर्वांत भावनिक अविष्कार ठरणार आहे. ओम छंगाणी आणि एचलॉन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शशांक उडापूरकर यांनी केले आहे. या चित्रपटात (Gabru) सनी देओलसोबत सिमरण बग्गा आणि प्रित कमानी मुख्य भूमिकेत झळकणार (Bollywood) आहेत. 13 मार्च 2026 रोजी हा चित्रपट पीव्हीआर पिक्चर्सच्या माध्यमातून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये (Entertainment News) प्रदर्शित होणार आहे.

‘गबरू’ ही एका अशा माणसाची कहाणी आहे, जो धैर्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेच्या बळावर आयुष्य जगतो. संघर्षाच्या क्षणांतही सौंदर्य शोधणाऱ्या, खऱ्या अर्थाने ‘गबरू’ असलेल्या त्या व्यक्तीची ही भावनिक सफर आहे. या चित्रपटाचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे त्याचे संगीत. मिथुन, सतिंदर सरताज आणि अनुराग सैकिया यांच्या संगीतासह सय्यद कादरी यांच्या कवितामय शब्दांनी सजलेले हे गाणी प्रेक्षकांच्या मनात खोलवर भावनिक ठसा उमटवतील.

ओम छंगाणी आणि विशाल राणा यांनी निर्मिती केलेला ‘गबरू’ हा सनी देओलकडून आपल्या चाहत्यांसाठी दिलेला एक खास वाढदिवसाचा भेटवस्तूच आहे. सनी देओल या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या भावनांचा आणि त्याच्या दंतकथेसारख्या प्रवासाचा उत्सव साजरा करणारा चित्रपट.

प्रदर्शन दिनांक: 13 मार्च 2026
प्रस्तुती: ओम छंगाणी, एचलॉन
दिग्दर्शन व लेखन: शशांक उडापूरकर
संगीत: मिथुन, सतिंदर सरताज, अनुराग सैकिया
गीत: सय्यद कादरी
मुख्य भूमिका: सनी देओल, सिमरण बग्गा, प्रित कमानी
प्रदर्शक: PVR Pictures

Exit mobile version