Download App

सनी पाजीच्या Border 2 चित्रपटात बॉलीवूडच्या ‘या’ चॉकलेट हिरोची वर्णी, झळकणार प्रमुख भूमिकेत

Border 2 Update: 'बॉर्डर' हा चित्रपट 1997 मध्ये रिलीज झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर खळबळ (Box Office) उडवून दिली होती.

Border 2 Update: ‘बॉर्डर’ हा चित्रपट 1997 मध्ये रिलीज झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर खळबळ (Box Office) उडवून दिली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल (Border Sequel) 2026 मध्ये येणार असून त्याच्या स्टारकास्टबाबत खुलासे केले जात आहेत. आधी सनी देओलने (Sunny Deol) या चित्रपटाची घोषणा केली आणि आता वरुण धवनची (Varun Dhawan) एन्ट्री निश्चित झाली आहे. यामुळे वरुण खूप खूश आहे आणि त्याने एक अनाउंसमेंट व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.


‘बॉर्डर’च्या आठवणी सांगताना वरुण धवनने ‘बॉर्डर 2’ (Border 2) चित्रपटात आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच वरुणने एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने ‘बॉर्डर 2’ बाबतचा अनुभव शेअर केला आहे.

‘बॉर्डर 2’मध्ये वरुण धवनची एन्ट्री

सनी देओलने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वरुण धवनचा आवाज ऐकू येतो. हा व्हिडीओ ‘बॉर्डर 2’ बाबत एक मोठा अपडेट सांगत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सनी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बॉर्डर 2’च्या बटालियनमध्ये सैनिक वरुण धवनचे स्वागत.

Border 2 : कधी सुरू होणार सनी पाजीच्या ‘बॉर्डर 2’ चे शूटिंग, कोण कोण असणार चित्रपटात?

वरुण धवननेही आनंद व्यक्त केला

वरुण धवनने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी 4 व्या वर्गात शिकत होतो, तेव्हा मी चंदन सिनेमात बॉर्डर पाहिला आणि या चित्रपटाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आजही ती भावना मला माझ्या देशासाठी सिनेमागृहात जाणवते. आज जेव्हा मी आपले सैन्य पाहतो तेव्हा मला सलाम करावासा वाटतो जेव्हा ते आपल्या संरक्षणासाठी सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देतात.

वरुण धवनने पुढे लिहिले, ‘जेपी दत्ता सर असे महाकाव्य चित्रपट बनवतात आणि ते माझे आवडतेही आहेत. भूषण कुमारने माझे करिअर आणखी खास बनवले आहे आणि मी सनी पाजीसोबत काम करणार आहे… हे सर्व माझ्यासाठी खूप खास आहे. मी या चित्रपटात एका सैनिकाची कथा मांडणार आहे आणि मी वचन देतो की हा सर्वात मोठा युद्ध चित्रपट असेल, मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे, जय हिंद..

follow us