Sunny Deol: ‘बॉर्डर 2’ आणि ‘गदर 3’ च्या सिक्वेलवर सनी देओलने थेटच सांगितलं, म्हणाला…

Sunny Deol: ‘बॉर्डर 2’ आणि ‘गदर 3’ च्या सिक्वेलवर सनी देओलने थेटच सांगितलं, म्हणाला…

Sunny Deol on Border 2: सन 2023 मध्ये सनी देओलचा (Sunny Deol) चित्रपट गदर 2 (Gadar 2) आला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. सनी देओलचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये होणारी गर्दी पाहता आजही चाहते सनी देओलच्या भारी डायलॉग्सचे वेड लागलेले दिसते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 600 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आणि त्याचे संवाद चाहत्यामध्ये लोकप्रिय झाले. सनी देओलने पुन्हा एकदा चित्रपटातील त्याच्या ‘तारा सिंह’ या पात्राला पूर्ण न्याय दिला. 2001 मध्ये आलेल्या ‘गदर’ या चित्रपटातही त्यांच्या आवाजात तीच तीव्रता होती. आता सध्या सनी ‘बॉर्डर 2’ आणि ‘गदर 3’च्या सिक्वेलवर पुन्हा काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सनी देओलच्या आगामी चित्रपटांमध्ये 1947 चा समावेश आहे. ज्याची निर्मिती आमिर खान करत आहे. याशिवाय सनी देओलकडे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत, पण जेव्हा त्याला विचारण्यात आले की ‘बॉर्डर 2’ आणि ‘गदर 3’ देखील येत आहेत, तेव्हा अभिनेत्याने काही आश्चर्यकारक उत्तर दिले आहे. त्याचे उत्तर ऐकून चाहते देखील निराश झाल्याचे पाहायला मिळाला आहे.

‘बॉर्डर 2’ आणि ‘गदर 3’वर सनी देओलने थेटच सांगितलं…: एका मुलाखतीमध्ये सनी देओलला विचारण्यात आले की तो बॉर्डर 2 आणि गदर 3 वरही काम सुरू करत आहे का? यावर अभिनेता म्हणाला, ‘सध्या गदर 2 ची आहे, आता बॉर्डर 2 आणि गदर 3ची चर्चा सुरू झाली आहे. हा भाग, तो भाग, मी किती सिक्वेल करू? यानंतर अभिनेता हसला आणि म्हणाला की, ‘तुम्ही सर्वांनी धीर धरावा, सध्या मी 1947 चे शूटिंग सुरू केले आहे, पुढे कोणाचा भाग येणार आहे ते तुम्हाला लवकरच कळणार आहे.’

मोदी सरकारचं पूनम पांडेला मोठं गिफ्ट मिळणार? आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू…

बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओलने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत पण त्याच्या चाहत्यांना देशभक्तीपर चित्रपट खूप आवडतात. सनी देओलने अलीकडेच 2001 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सिक्वेल केला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. चित्रपटात तारा सिंग आणि सकिना यांच्या मुलाची प्रेमकथा दाखवण्यात आली होती पण भारत-पाकिस्तानची कथाही याच पद्धतीने दाखवण्यात आली होती. आता सनी देओलकडे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्यांचा खुलासा झालेला नाही पण आगामी चित्रपटांबद्दल तुम्हाला माहिती मिळेल असे सांगून सनी देओलने चाहत्यांना दिलासा दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज