मोदी सरकारचं पूनम पांडेला मोठं गिफ्ट मिळणार? आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू…

मोदी सरकारचं पूनम पांडेला मोठं गिफ्ट मिळणार? आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू…

Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे, तिच्या फेक मृत्यूच्या बातमीमुळे सर्वत्र पसरवली होती. (Social media) आता सध्या महत्वाची माहिती समोर आली आहे, नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Govt) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेचा चेहरा बनू शकते. याबाबत बुधवारी एका वृत्तात ही ,माहिती देण्यात आली आहे. पूनम पांडे आणि तिची टीम मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य मंत्रालयाशी याबाबत आधीच चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

2 फेब्रुवारीला सकाळी पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम (Instagram) हँडलवर दावा करण्यात आला की, अभिनेत्रीचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, पण त्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. सोशल मीडियावर (Social media) वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावले जात होते, त्यानंतर 24 तासांनंतर पूनमने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि ती जिवंत असल्याची माहिती दिली आणि तिच्या मृत्यूची बातमी ही एका मोहिमेचा भाग होती.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या नवीन उपक्रमाबद्दल बोलल्यापासून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर वेगळ्या पद्धतीने लक्ष केंद्रित करण्याचा कल वाढत आहे. पण पूनम पांडेची ही पद्धत ना सर्वसामान्यांना आवडली नाही.

Safe Internate Day निमित्त युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून आयुष्मान खुरानाकडून जनजागृती

पूनम पांडेनेही एक इशारा दिला: पूनमने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या नव्या कामाची हिंट दिली आहे. त्यांनी लिहिले, “आपण मिळून या आजाराचा विनाशकारी प्रभाव दूर करण्याचा प्रयत्न करूया. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, “सरकार 9-14 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरणास प्रोत्साहन देईल.”

मात्र, तिच्या मृत्यूची बातमी पसरवल्याने पूनम पांडेला चहुबाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे. लोक म्हणतात की पूनमने कॅन्सर झालेल्यांची खिल्ली उडवली आहे. ज्यावर पूनमने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, तिच्या आईचाही मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने झाला आहे, कोणाच्याही भावना दुखावण्याचा तिचा हेतू नव्हता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube