Safe Internate Day निमित्त युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून आयुष्मान खुरानाकडून जनजागृती

Safe Internate Day निमित्त युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून आयुष्मान खुरानाकडून जनजागृती

Safe Internet Day : सेफ इंटरनेट डे (Safe Internet Day ) निमित्त अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने तरुणांमध्ये जनजागृती केली आहे. आयुष्मानने युथ आयकॉन आणि युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून इंटरनेटचे महत्त्व आणि त्याचे संभावित धोके याबद्दल माहिती देखील दिली आहे.

अरविंद केजरीवाल हाजीर हो! दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनंतर कोर्टाने पाठवले समन्स

तसेच आयुष्मान खुराना हा त्याचे चित्रपट, वैयक्तिक आयुष्यातील काही ऍक्टिव्हिटीमधून देखील सातत्याने सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच महत्त्वाच्या विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी तो नेहमीच वेगवेगळ्या व्यासपीठांवरून एक दिशादर्शक काम करतो. तर आजच्या सेफ इंटरनेट डेनिमित्त आयुष्मानने एक संवाद साधला.

‘मास्तरिन बाई, नाही तर आम्हीच शिकवू चांगला धडा!’ मृणाल कुलकर्णींनी सून शिवानीला भरला दम…

त्यावेळी त्याने मुलांना इंटरनेट वापराचे प्रशिक्षण देण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. तसेच डिजिटल क्षेत्रात त्यांना तोंड द्यावे लागणारे धोके ओळखून मुलांसाठी सुरक्षित ऑनलाईन अनुभवांसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलं.तसेच पुढे आयुष्मान म्हणाला की, इंटरनेट हे एक शक्तिशाली साधन आहे, त्याचा वापर करून मुले जगाबद्दल जाणून घेऊ शकतात, नवीन छंद जोपासू शकतात, नोकरीच्या संधी निर्माण करू शकतात आणि शोधू शकतात.

मात्र फायद्यांबरोबरच त्याची काही दुष्परिणाम देखील बघायला मिळतात. ज्यामध्ये ऑनलाईन ट्रोलिंग मानसिक आरोग्य आणि आत्मसन्मानावर होणारे आघात. यासाठी मुलांनी त्यांच्या जवळील विश्वासू प्रौढ व्यक्ती म्हणजेच पालक किंवा कुटुंबातील इतर सदस्य किंवा शिक्षक यांच्याशी संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज