Download App

Sunny Leone: सनी लिओनीने ऑटिस्टिक मुलांसोबत केलेला रॅम्प वॉक पाहिलात का?

Sunny Leone: सनी लिओनीने (Sunny Leone) कालिकत येथे ऑटिस्टिक मुलांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असून (Ramp Walk) या कृत्याने केरळच्या लोकांच्या हृदयावर एक अनोखी छाप पाडली आहे.

सनी लिओनीच्या उपस्थितीने या खास कार्यक्रमात आशेचा किरण आणला आणि तिच्या प्रामाणिक स्मिताने एक वेगळीच मजा यात आली. ती त्यांच्यापैकी काहींसोबत हातात हात घालून रॅम्प वर चालत असताना तिचे डोळे आनंदा ने भरून आले. ऑटिस्टिक मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सनी लिओनीची अतूट बांधिलकी, कार्यक्रमाच्या प्रायोजकांना तिचा दृढ पाठिंबा आणि मुलांवरचे तिचे खरे प्रेम यातून दिसून आले.


पिढ्यानपिढ्या टिकून राहणार प्रेम आणि प्रेमाचा वारसा सोबतीला घेऊन ती या खास मुलांसाठी आशेचे प्रतीक बनली. तिच्या व्यावसायिक क्षेत्रात ती तिच्या “केनेडी” चित्रपटाने जागतिक पातळीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. सोबतीला जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या प्रतिभावंतांसमवेत तिच्या “कोटेशन गँग” या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ज्याने दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत.

सनीने आतापर्यंत हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम कन्नड आणि मराठी चित्रपटातील गाण्यांवर जबदस्त डान्स केले आहेत. यापूर्वी देखील सनी लिओनीने ‘बॉईज’ या मराठी चित्रपटाच्या ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. दरम्यान, सनी लियोनी लवकरच संजीव कुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये ‘शांताबाई’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसणार आहे.

Hemant Dhome: जालना लाठीचार्जवर मराठी अभिनेता संतापला; म्हणाला, ‘राजकारणासाठी सारं..’

या चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून सनी लिओनी आधुनिक शांताबाईचा आवतार दाखवताना दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवा यांनी या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचं मूळ गीत असलेले हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर दिली आहे. सनी लिओनीचे चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात.

Tags

follow us