Umrao Jaan : बॉलीवूड अभिनेत्री रेखा काहींना काही कारणाने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहते. तर आता पुन्हा एकदा रेखा सोशल मीडियावर चर्चेत आहे. रेखाचा सुपरहिट चित्रपट उमराव जान (Umrao Jaan) पुन्हा एकादा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उमराव जान साठी निर्माते आणि वितरक, पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्स भव्य प्रीमियर करणार आहे.
माहितीनुसार, या प्रीमियरसाठी अनेक मोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. नुकतंच या प्रीमियरसाठी कोणते बॉलीवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे प्रीमियर मुझफ्फर अली (Mujaffar Ali) आणि रेखा (Rekha) मुंबईतील बीकेसी येथील पीव्हीआर मैसन, जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे 26 जूनच्या रात्री आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश असेल पण या यादीत बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव नाही.
कान्होबा देवस्थानात आमदारांच्या हस्ते आरती; पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडला धार्मिक विधी
वृत्तानुसार, उमराव जानचा प्रीमियर खूप भव्य होणार आहे. या यादीत आमिर खान, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, खुशी कपूर, आयुष्मान खुराना, कृती सेनन, डिंपल कपाडिया, हेलेन, शबाना आझमी, अनिल कपूर, राकेश रोशन, एआर रहमान, सुनील शेट्टी, रिचा चढ्ढा, अली फजल, तब्बू, जॅकी श्रॉफ, अरबाज खान, सोहेल खान, बोनी कपूर, विजय वर्मा, वेदांग रैना अशा अनेक सेलिब्रिटींची नावे आहेत. पण बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव त्यात नाही. रेखा यांचे अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय यांच्याशी खास नाते आहे. ऐश्वर्याचे नावही या यादीत नाही.