…तर मंत्रालयाबाहेर ढोलकी-घुंगरांचा आवाज घुमणार; ‘तो’ व्हिडीओ दाखवत सुरेखा पुणेकरांचा इशारा!

Surekha Punekar Warn for Strike at Mantralay for ban on DJ and Dance Bar : जेष्ठ लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राज्यात सर्रास सुरू असलेल्या डान्स बारवर आक्षेप घेतला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी एक व्हिडीओ दाखवला. ज्यामध्ये आक्षेपार्ह नृत्य आणि धिंगाणा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात सांस्कृतिक कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेले डान्स बार आणि डीजेंवर बंदी आणावी. अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावर लेट्स अप मराठीने सुरेखा पुणेकरांशी संवाद साधलe त्या काय म्हणाल्या पाहुयात…
Video : सायबर चोरट्यांनी 10 महिन्यांत लुटले 4,245 कोटी; राज्यसभेत सरकारची माहिती
यावेळी त्यांनी राज्यात डान्स बार बंदी असताना सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये महिलांना नाचवत त्यांच्यावर पैसे उधळले जात असल्याचा एक व्हिडीओ दाखवला आहे. त्यामध्ये महिलांवर पैसे उधळले जात आहेत . आक्षेपार्ह नृत्य आणि धिंगाणा सुरू असल्याचं पाहायला मिळतच आहे. तसेच सांस्कृतिक कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेले डान्स बार आणि डीजे सुरू आहे. यावरून सुरेखा पुणेकरांनी लावणी कलाकारांच्या व्यथा मांडत डान्स बार आणि डीजेंवर बंदी आणावी. अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा…पंकजा मुंडे बीड जिल्ह्याबाबत काय म्हणाल्या?
यावेळी लेट्स अप मराठीशी बोलताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, आमची एकच मागणी आहे की, डीजे बंद झाला पाहिजे. कारण त्यामुळे 10 हजार कलावंतावर उपासमारीची वेळ येत आहे. डीजेमुळे मेकअप, ते वाजंत्री असे अनेक कलावंतांची गरज भासत नाही. त्यामुळे ही कला लोप पावत चालली आहे. तसेच सांस्कृतिक कला केंद्रांना लाईव्ह कला दाखवण्याचं लायसन्स देण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालून अशा प्रकारे डिजे आणि डान्स बारवर बंदी घालावी. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अजित पवार, एकनाथ शिंदे आणि संबंधित मंत्र्यांना भेटणार आहे. तरी देखील यावर कारवाई झाली नाही तर आम्ही थेट मंत्रालयाबाहेर ढोलकी-घुंगरांचा आवाज घुमवत धरणे आंदोलन करू असा इशारा यावेळी पुणेकर यांनी दिला.