संतोष देशमुख यांची हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा…पंकजा मुंडे बीड जिल्ह्याबाबत काय म्हणाल्या?

संतोष देशमुख यांची हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा…पंकजा मुंडे बीड जिल्ह्याबाबत काय म्हणाल्या?

Pankaja Munde My Vision : संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा घडणार नाही. याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. आज राज्यातच अशा घटना सगळीकडं घडत आहेत. (Munde) आता नागपूर तर पेटलच आहे अस म्हणत पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केल आहे. माझ्या दृष्टीने या विषयावरून आता आपण महाराष्ट्रातील पुढच्या विषयाकडं वळलं पाहिजे असंदी त्या म्हणाल्या आहेत.

यावेळी त्यांना ज्यावेळी बीड जिल्ह्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या रागावल्याचं दिसल. आज जी बीड जिल्ह्यात परिस्थिती आहे ती दाखवली जात आहे तशी नाही. काही लोकांनी ती तशी तयार केली आहे. त्यामुळं येत्या काळात ती परिस्थिती बदलणार आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

 तर सुरेश धस 75 हजारांच्या लीडने निवडून आले असते का? पंकजा मुंडेंचा सवाल

गोपीनाथ मुंडे आत्ताच्या परिस्थितीत असते तर काय परिस्थिती असती या प्रश्नावर बोलताना पंकजा यांनी त्यांची कुणाशी तुलना करण योग्य नाही अस त्या म्हणाल्या. त्याचबरोबर मुंडे हे दाऊदला घाबरत नव्हते. त्यामुळे त्यांच्या काळ वेगळा होता. मात्र, आताही मी कुणाच्या शब्दांच्या गोळ्यांना घबरत नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

गोपीनाथ मुंडे हे काही बीडचे नव्हते ते पूर्ण महाराष्ट्राचे होते. त्यामुळे त्यांच्या कामाचा आवाका मोठा होता. आज तसेच दिवस नाहीत. आता जो संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रश्न विचारला जातो तो विषय आता मागं पडलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता त्या विषयात काय होत याची माहिती घेत असतील असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube