Captain Miller Teaser Out: ‘कॅप्टन मिलर’ चा जबरदस्त टीझर आऊट; धनुषच्या लूकवरुन नेटकरी व चाहते चक्रावले

Captain Miller Teaser Out: साऊथ सुपरस्टार धनुषचा (Dhanush) काल वाढदिवस होता. धनुषचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आज धनुषच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ (Captain Miller) या आगामी सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये धनुष हा हटके भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टन मिलर’ या […]

Captain Miller Teaser Out

Captain Miller Teaser Out

Captain Miller Teaser Out: साऊथ सुपरस्टार धनुषचा (Dhanush) काल वाढदिवस होता. धनुषचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आज धनुषच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ (Captain Miller) या आगामी सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये धनुष हा हटके भूमिकेत पाहायला मिळत आहे.

‘कॅप्टन मिलर’ या सिनेमाच्या टीझरमध्ये धनुषचा हटके अंदाज दिसत आहे. या १ मिनिट ३३ सेकंदाच्या टीझरमध्ये धनुषचा रावडी लूक दिसून आला आहे. या टीझरमध्ये असे दिसून येत आहे की, कॅप्टन मिलर हा ब्रिटीश सैन्याच्या दृष्टीने एक गुन्हेगार असल्याचे बघायला मिळत आहे. अरुण माथेश्वरन यांनी ‘कॅप्टन मिलर’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. याअगोदर त्यांनी ‘रॉकी’ आणि ‘सानी कायधाम’ यांसारखे सिनेमा दिग्दर्शित केले आहेत. हा सिनेमा १५ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रदर्शित झाला आहे.

‘कॅप्टन मिलर’ या सिनेमात धनुषबरोबर सुदीप किशन, नासर, एलंगो कुमारवेल, एडवर्ड सोनेनब्लिक, विजी चंद्रशेखर, निवेदिथा सतीश, जॉन कोककेन, विनोथ किशन, बाला सरवनन, सुमेश मूर हे हटके कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून धनुषनं त्याच्या ‘कॅप्टन मिलर’ या सिनेमातील लूकचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.


‘कॅप्टन मिलर’ बरोबर धनुषच्या ‘तेरे इश्क में’ या आगामी सिनेमाची चाहत्यांना मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा एक खास व्हिडीओ देखील धनुषने सोशल मीडियावर शेअर केला होता. दिग्दर्शक आनंद एल राय यांनी ‘तेरे इश्क में’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. द ग्रे-मॅन या हॉलिवूड सिनेमामध्ये देखील धनुषनं काम केले आहे. धनुष हा गेल्या काही दिवसांपासून ‘वाथी’ या सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला आला होता. आता धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ आणि ‘तेरे इश्क में’ या आगामी सिनेमाची त्याचे चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Video : अन् अनिल कपूरच्या जर्मन चाहत्याने रस्त्यावर लावलं ‘राम लखन’ चं गाणं पाहा…

Exit mobile version