Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh) मृत्यूला 3 वर्ष झाली आहेत. परंतु आजून देखील सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Case) काही देखील धागेदोरे हाती लागले नाहीत. तसेच हे प्रकरण केंद्रीय शोध यंत्रणा म्हणजेच CBIकडे देण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत या प्रकरणामध्ये कोणतीही नवीन अपडेट समोर आली नाही. दरम्यान आता या प्रकरणामध्ये अमेरिकेची एंट्री झाली आहे.
सुशांत सिंहचे सर्व चॅट्स आणि ईमेल तसेच पोस्टचे तपशील शेअर करण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी कंपनीने २०२१ मध्ये कॅलिफोर्नियामधील गुगल आणि फेसबुक यांच्या मुख्य कार्यालयाला औपचारिक विनंती केली होती. जेणेकरून सुशांतच्या सर्व मेसेज, चॅट्सचं व्यवस्थित मिळू शकतील. २०१४ मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या राहत्या घरात गळफास लावल्याचे दिसून आला होता. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांकडे असलेलं हे प्रकरण CBIकडे वर्ग करण्यात आले आहे.
भारत आणि अमेरिकेमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देश कोणते देखील देशांतर्गत माहिती एकमेकांकडून मिळवू शकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, सुशांत सिंह राजपूरच्या मृत्यू प्रकरणातील काही तांत्रिक पुरव्यांसाठी आम्ही अमेरिकेच्या प्रतिसादाची वाट बघत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला तर तांत्रिक निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल
या सगळ्या गोष्टींमुळे या प्रकरणाला अंतिम स्वरुप देण्यासाठी खूपच विलंब होत आहे. या प्रकरणामध्ये ज्येष्ठ वकील विकास सिंह हे सुशांतच्या कुटुंबियांच्या वतीने प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक पुराव्यांच्या विनंतीबद्दल मला माहिती नाही. परंतु सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा तपास फार हळुवार गतीने करत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर मोठे भाष्य केले आहे, त्यांच्याकडे या प्रकरणात काही पुरेसे पुरावे आहेत. राज्याने माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी ते पुरावे पोलिसांकडे द्यावेत अशी विनंती करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवं वळणं मिळण्याची शक्यता आहे.