हार्ट अटॅकनंतर सुष्मिता सेन झाली भावूक, चाहत्यांचे मानले आभार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen) काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका (heart attack) आला होता. तिने सोशल मीडियातून एका पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती दिली होती. यानंतर सुष्मिता लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना देखील केली होती. आता तिने सोशल मीडियातून एका व्हिडिओद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. […]

Untitled Design (3)

Untitled Design (3)

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen) काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका (heart attack) आला होता. तिने सोशल मीडियातून एका पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती दिली होती. यानंतर सुष्मिता लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना देखील केली होती. आता तिने सोशल मीडियातून एका व्हिडिओद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. परंतु आता ती ठीक आहे. दरम्यान सुष्मिता सेनने नुकतेच लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत आपली आवस्था शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन चाहत्यांना आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली.

सुष्मिताने हार्ट अटॅकवर कशी मात केली याबाबत सांगितले. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांचे आणि वैद्यकीय पथकाचे विशेष आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये सुष्मिताचा घसा दुखत असून तिला बोलताना त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

WIPL 2023: महिला प्रीमियर लीगला धमाकेदार सुरुवात; सलामीच्या सामन्यात गुजरात जायंट्सनं जिंकली नाणेफेक

लाईव्ह आल्यानंतर सुष्मिता म्हणाली, ‘मला खूप छान वाटत आहे. मला जवळपास सगळीकडून खूप प्रेम मिळाले आहे. याशिवाय लोक ज्या प्रार्थना आणि शुभेच्छा पाठवत आहेत त्याबद्दल धन्यवाद. मला बरे वाटत आहे आणि हा फक्त आवाज आहे, हे व्हायरल आहे. त्यामुळे मी चांगली नाही असे समजू नका. मला खूप बरे वाटत आहे. मी व्हायरलच्या लसीची वाट पाहिली असती तर मला हॅलो म्हणायला उशीर झाला असता. हे हवंच होतं. मला येऊन तुम्हा सर्वांना नमस्ते म्हणायचे होते’.

सुष्मिता पुढे म्हणाली, ‘ऐका मित्रांनो, या गेल्या महिन्यात अनेक लोकांसोबत खूप काही घडले आहे. फक्त तुम्हाला सांगू इच्छिते की मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. मी 95 टक्के ब्लॉकेजसह मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचले आहे. आज मी सर्वांसमोर आहेत तर ते नानावटी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच’.

Exit mobile version