TV Serial : ‘या’ मालिकेत सुयश टिळक साकारणार खलनायक !

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोनी मरीाठी या वहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कानडी असलेली प्रतिक्षा शिवणकर आणि कोल्हापूरचा रांगडा राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. पण सर्वच मालिकांप्रमाणे या ही मालिकेत या नायकांच्या आयुष्यात आता खलनायकाची एन्ट्री होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की, हा […]

Jivachi Hotiy Kahili

Jivachi Hotiy Kahili

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोनी मरीाठी या वहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कानडी असलेली प्रतिक्षा शिवणकर आणि कोल्हापूरचा रांगडा राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. पण सर्वच मालिकांप्रमाणे या ही मालिकेत या नायकांच्या आयुष्यात आता खलनायकाची एन्ट्री होणार आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की, हा खलनायक कोण आहे ? तर हा खलनायक दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा लाडका अभिनेता सुयश टिळक आहे. कार्तिक देवराज असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. पहिल्यांदाच अशी खलनायकाची भूमिका साकारणार आहे. कार्तिक देवराज गावातला सरकारी अधिकारी असून कोकटनूर यांचावर त्याची जबाबदारी असेल. कार्तिक देवराज याची भूमिका सुयश टिळक करत आहे. अशा प्रकारची भूमिका सुयशने कधी केली नाही. त्याच्या वेशाची विशेष चर्चा होईल यात शंका नाही.

Marathi Movie : ‘चौक’ चे पहिले पोस्टर रिलीज, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अर्जुन आणि कार्तिक देवराज यांची चांगली मैत्री असेल, पण कार्तिक देवराज ही नकारात्मक व्यक्तिरेखा असेल. तो रेवथी आणि अर्जुन यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. कार्तिक देवराज याच्या येण्याने रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या या प्रेमकहाणीमध्ये काही नवे आश्चर्यकारक बदल पाहायला मिळताहेत का ? हे कळणार आहे.

Exit mobile version