Swapnil Joshi : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आता मोठा धमाका करण्याच्या तयारी आहे. स्वप्नील जोशी लवकरच गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. माहितीनुसार, “शुभचिंतक” (Shubhchintak) अस या चित्रपटाचं नाव असून प्रक्षेकांच्या भेटीला हा चित्रपट 2025 मध्ये येणार आहे. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2024 वर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आहे आहे. प्रेक्षकांना स्वप्नील येणाऱ्या वर्षात एका नव्या कोऱ्या गुजराती चित्रपटात दिसणार आहे. स्वप्नील गुजराती चित्रपटात विश्वात पदार्पण करतोय ही मराठी चित्रपटसृष्टी साठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. वैविध्यपूर्ण भूमिकाच्या सोबतीने बहुभाषिक चित्रपट करण्याकडे नेहमीच स्वप्नीलचा कल असतो आणि आता तो त्याचा पहिला वहिला गुजराती चित्रपट करण्यासाठी सज्ज आहे.
या रोमांचक आणि कमाल प्रकल्पाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत असून गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या गाजलेल्या हिट चित्रपटांनंतर त्यांची ही चौथी निर्मिती असणार आहे. निसर्ग वैद्य दिग्दर्शित, ज्यांनी यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ रांदेरियासोबत गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते ते हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचं सांगतात.
या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला “गुजराती चित्रपट उद्योग वेगाने विकसित होत आहे आणि वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती करत आहे जी दूरवरच्या प्रेक्षकांना ऐकू येते आहे. सिनेमाची जादू सार्वत्रिक असावी यावर माझा नेहमीच विश्वास आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळं निमित्तानं करायला मिळतंय याचा आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे.
या भूमिकेने मला नक्कीच आव्हान दिल आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी उस्तुक आहे” या आगामी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री-निर्माती मानसी पारेख पुढे म्हणाली, “स्वप्नील या चित्रपटात ऑनबोर्ड झाला आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे. स्वप्नील सोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आम्ही लुक टेस्ट आणि वर्कशॉपसाठी आधीच भेटलो आहोत आमच्या सुरुवातीच्या नोट्सची देवाणघेवाण केली आणि आता कधी एकदा रोल होतोय याची वाट पाहत आहोत.
प्रत्येक घराला सोलर पॅनल अन् भरघोस सबसिडी, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेंबद्दल जाणून घ्या सर्वकाही
मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात दमदार पाऊल ठेवून कमालीचा अभिनय करणार आहे यात शंका नाही. स्वप्नीलने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील आपल्या अविस्मरणीय कामगिरीने कायम प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन केले आहे आता शुभचिंतक या नव्या गुजराती चित्रपटाची कथा काय ? तो काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.