Swapnil Joshi: चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा रॉयल अन् स्टायलीश अंदाज, फोटो व्हायरल…

Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिने इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. अभिनयाच्या जोरावर त्याने आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

स्वप्नील जोशीला मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हटलं जातं.

चेकमेट, आम्ही सातपुते, दुनियादारी, मितवा, मुंबई पुणे मुंबई या सिनेमात स्वप्नीलने काम केलं.

स्वप्नील जोशी सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. आपले फोटो तो चाहत्यांशी शेअर करतो.

आताही त्याने आपले काही स्टायलीश अंदाजातील खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोत त्याने डोळ्यांवर गॉगल, हातात घडी घातलेली दिसत आहे.

स्वप्नील जोशीने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक खास पोज दिल्या आहेत.
