Download App

Bai G: 5 जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? ‘बाई गं’ सिनेमाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

Bai G Trailer : नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, (Bai G Movie) असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत.

Bai G Trailer Released: नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, (Bai G Movie) असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत. (Swapnil Joshi) वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही, मागच्या 5 जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो. (Marathi Movie) आता हे येत्या 12 जुलैला आपल्याला ‘बाई गं’ ह्या (Bai G Trailer) चित्रपटाद्वारे समजणार आहे. आता या भन्नाट चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

ट्रेलरमध्ये आपण स्वप्नीलची तारेवरची कसरत पाहू शकणार आहोत. कॉमेडी आणि भावनेने भरपूर असा हा ट्रेलर असून यात शेवटी स्वप्नीलला बाईच्या मनाला समजायला बाई चं रूप घ्यावं लागतंय. आता या चित्रपटाचा शेवट नक्की काय असेल हे पाहणं रोमांचक ठरणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. “बाई गं” या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ हा चित्रपट 12 जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तसेच आपली हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आपले सण आणि उत्सव उत्साहात साजरे व्हायला हवेत यासाठी 29 जून रोजी संघ्याकाळी 7 वाजल्यापासून पार्लेस्वर गोविंदा पथक आणि.. गणेशोत्सवासाठी पार्लेस्वर ढोलताशा पथक यांचा सराव शुभारंभ हनुमान मंदिर, साठेवाडी, विर्लेपार्ले पूर्व इथे आयोजित केला होता.

Bai G Movie : ‘बाई गं’ ची फायनल तारीख ठरली,’या’ दिवशी होणार रिलीज? वाचा एका क्लिकवर

सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी “बाई गं” चित्रपटाची टीम तेथे उपस्थित होती. या प्रसंगी सर्वांनी जास्तीत जास्त पार्लेकरांनी उपस्थीत राहून बाई गं टीमच्या साथीनं या उत्साहात रंगत आणली. ढोल ताशाच्या गजरात ‘बाई गं’ टिमचे कलाकार नाचले आणि त्यांनीसुध्दा ढोल ताशा वादनात सहभाग घेतला. पार्लेस्वर गोविंदा पथकाने उंच मनोरे रचत शेवटच्या थरावरून बाई गं चित्रपटाचे पोस्टर झळकवत सगळ्या कलाकारांना मानवंदंना देत चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.

follow us

वेब स्टोरीज